आशु सिंघल महानगर गॅस लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकपदी

सिंघल यांच्याकडे हायड्रोकार्बन क्षेत्राचा ३१ वर्षांचा समृद्ध अनुभव आहे ज्यामध्ये कॉर्पोरेट नीती, मोठ्या पातळीवरील प्रकल्पांची अंमलबजावणी उदाहरणार्थ देशभरात गॅस पाइपलाइन्स, पेट्रोकेमिकल आणि एलएनजी अशांसारख्या विभिन्न कार्यक्षेत्रांचा समावेश होतो.

मुंबई : सीएसपीए, आरएम, टीक्युएम आणि एसडी, गेलचे कार्यकारी संचालक आशु सिंघल यांनी २३ डिसेंबर रोजी महानगर गॅस लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकाचा पदभार स्वीकारला आहे.
सिंघल हे एनआयटी, सिल्चर येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर असून त्यांनी ऑपरेशन मॅनेजमेंटमध्ये स्पेशलायझेशनसह बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (एमबीए) पदवी संपादन केली आहे. येथे रुजू होण्यापूर्वी, ते गेल (इंडिया) लिमिटेड येथे कार्यकारी संचालकाच्या रूपाने कॉर्पोरेट स्ट्रॅटजी, प्लॅनिंग अँड ॲड्व्होकसी, रिस्क मॅनेजमेंट, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट विभागांचे प्रमुख होते, व त्याच वेळी त्या संस्थेचे चिफ रिस्क ऑफिसर म्हणून देखील कार्यरत होते. ते ओएनजीसी पेट्रो ॲडिशन्स लि. (ओपीएएल) च्या आणि तालचेर फर्टिलायझर लि. (टीएफएल) च्या मंडळावर संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. यापूर्वी ते महानगर गॅस लि. (एमजीएल) च्या मंडळावर संचालक राहिलेले आहेत.
सिंघल यांच्याकडे हायड्रोकार्बन क्षेत्राचा ३१ वर्षांचा समृद्ध अनुभव आहे ज्यामध्ये कॉर्पोरेट नीती, मोठ्या पातळीवरील प्रकल्पांची अंमलबजावणी उदाहरणार्थ देशभरात गॅस पाइपलाइन्स, पेट्रोकेमिकल आणि एलएनजी अशांसारख्या विभिन्न कार्यक्षेत्रांचा समावेश होतो. त्यांनी गेलच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सर्वोच्च व्यवस्थापनासोबत जवळून काम केले आहे, त्याबरोबरच विविध बहुस्तरीय संस्था, औद्योगिक संघटना, समित्या आणि विचार मंचांमध्ये नैसर्गिक वायूच्या पुरस्कारासाठीच्या कार्यक्रमांतर्गत हितसंबंधींचा सहभाग वाढवणाऱ्या उपक्रमांसाठी मध्यस्थाचे काम केले आहे.
जवळपास २०,००० कोटी रुपये एवढा केपेक्स असणाऱ्या अनेक महाप्रकल्पांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात सिंघल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे ज्यामध्ये देशभरात गॅस पाइपलाइन्स बसवणे आणि पाटा, उ.प्र. येथे नैसर्गिक वायू आधारित संकलित पेट्रोकेमिकल विस्तार प्रकल्प राबवणे आदींचा समावेश होतो. त्यांनी गेलमध्ये प्रॉफिट मॅक्झिमायझेशनच्या कामाचे नेतृत्व केले ज्यामुळे कामकाजातील कार्यक्षमता, खर्चातील घट आणि उत्पन्नातील वाढीमार्फत १००० कोटींहून अधिक रुपयांचा लाभ जमा वसुल करता आला.
गेलचे चीफ रिस्क अँड स्ट्रॅटजी ऑफिसर म्हणून – त्यांनी यशस्वीपणे एलएनजी कंत्राटांमधील मूल्य जोखीम, निर्देशांक जोखीम (एचएच, ब्रेंट), आणि चलन जोखीम हाताळली ज्यांचा नक्त नफ्यावर परिणाम होतो. सिंघल यांनी भारतीय औद्योगिक शिष्टमंडळाचे युएस सरकारच्या ख्यातनाम इंटरनॅशनल लीडरशीप प्रोग्रॅममध्ये प्रतिनिधित्व देखील केले आहे.

 159 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.