एचजीएच इंडियाच्या १२व्या आवृत्तीला उत्स्फूर्त प्रतिसाद

४०० ब्रँड व उत्पादकांकडील १०० पेक्षा जास्त प्रदर्शक सहभागी

मुंबई : होम आणि हाऊसवेयर उद्योगक्षेत्रात भारतातील सर्वात लोकप्रिय ट्रेड शो एचजीएच इंडियाच्या १२व्या आवृत्तीचे आयोजन १३ ते १६ डिसेंबर दरम्यान गोरेगावमधील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये करण्यात आले होते. या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एचजीएच इंडिया २०२२ स्प्रिंग, समर आवृत्तीमध्ये भारतभरातून आणि ३० इतर देशांमधील ४०० ब्रँड व उत्पादकांकडील १०० पेक्षा जास्त प्रदर्शक सहभागी झाले होते. होम टेक्स्टाईल्स, होम डेकोर, होम फर्निचर, हाऊसवेयर आणि गिफ्ट्स विभागांमधील अनेक नवी उत्पादने व नवे पुरवठादार या ट्रेड शोमध्ये प्रस्तुत केले गेले. एचजीएच इंडियाच्या १३व्या आवृत्तीचे आयोजन याच ठिकाणी जुलै २०२३ मध्ये करण्यात येणार आहे.
पहिल्यांदा या ट्रेड शोमध्ये सहभागी होत असलेल्या प्रदर्शकांपैकी एक इटालियन नॅशनल पॅव्हिलियनमध्ये इटालियन ट्रेड एजन्सीअंतर्गत ९ प्रदर्शक सहभागी झाले होते. या प्रदर्शकांनी होम फर्निचर, वूडन फ्लोरिंग, वॉलपेपर, इंटिरियर डिझाइन्स आणि सजावटीच्या ऍक्सेसरीजची उत्तम प्रकारे डिझाईन केलेली श्रेणी सादर केली. या प्रदर्शनातील सहभागाद्वारे वितरक, ब्रँड प्रतिनिधी, फ्रँचायझी, इम्पोर्टर्स, आर्किटेक्ट्स आणि इंटिरियर डिझायनर्सच्या रूपात भारतामध्ये दीर्घकालीन व्यवसाय भागीदार निवडणे हे त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट होते.
एचजीएच इंडियाचे एमडी अरुण रुंगटा यांनी सांगितले, “एचजीएच इंडियामार्फत सोर्सिंगसाठी नवीन स्प्रिंग/समर सीझनच्या उत्पादनांना रिटेलर्सकडून मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद घरगुती उत्पादनांबद्दल भारतीय बाजारपेठेच्या परिपक्वतेमध्ये होत असलेली वाढ दर्शवतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत मागणीमध्ये २०% च्या वाढीसह भारत चीनच्या पुढे जाऊन पोहोचला आहे आणि होम टेक्स्टाईल्स, फर्निचर, सजावटीच्या ऍक्सेसरीज आणि हाऊसवेयर उत्पादनांचे अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड्स भारताला जगातील सर्वात आकर्षक बाजारपेठ मानू लागले आहेत. ग्राहकांची वाढती संख्या आणि घरांवर केल्या जाणाऱ्या खर्चात होणारी वाढ या गोष्टी ध्यानात घेता, पुढील दशकावर भारताचे राज्य असेल हे नक्की. बाजारपेठेत कॉन्झर्वेटिव्ह सिनारियोमध्ये १५% ची किमान वाढ कायम राहील, जी वॉलपेपर्स आणि किड्स होमसारख्या काही कॅटेगरीजमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत ३०% पर्यंत वर जाऊ शकते. बेडशीट्ससारख्या मॅच्युअर कॅटेगरीजमध्ये पुढील दशकामध्ये दरवर्षी १२-१५% वाढ कायम राहील.”

 177 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.