जयपोर-एबीएफआरएलचे विंटर वेडिंग कलेक्शन बाजारात दाखल


• प्रसिद्ध पार्श्वगायिका खुशबू ग्रेवाल यांच्या सहयोगाने खास संध्येचे आयोजन
• सिंपल कौर, डिंपल जांगडा, धृती सहारन, शिल्पा सकलानी आणि आकृती अहुजा यांच्यासारख्या सेलेब्रिटींची उपस्थिती

मुंबई : जयपोर या एबीएफआरएलच्या भारतातील आघाडीच्या आर्टिसनल लाइफस्टाइल ब्रँडतर्फे विंटर वेडिंग कलेक्शन सादर करण्यात आले. वांद्रे पश्चिम येथील टर्नर रोडवरील या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. निमंत्रितांसाठी आयोजित या खास कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रख्यात पार्श्वगायिका खुशबू ग्रेवाल यांनी केले. उपस्थितांमध्ये सिंपल कौर, डिंपल जांगडा, धृती सहारन, शिल्पा सकलानी, आकृती अहुजा, श्रिमा राय, हिमानी सिंग आणि श्वेता भारद्वाज इ. सेलेब्रिटी उपस्थित होत्या. सेलेब्रिटी पाहुण्यांनी या कार्यक्रमासाठी खास तयार करण्यात आलेले शाही पेहेराव आणि सौंदर्यानुभव देणाऱ्या फॅशन ॲक्सेसरी परिधान केल्या होत्या.
भरीव अलंकार, स्तिमित करणारे भरतकाम, भारतीय स्पर्श असलेले सुंदर रंग असलेले जयपोर विंटर वेडिंग कलेक्शन भारतीय कारागिरीला चालना देते आणि क्लॉजेटमध्ये आणि घरामध्ये मोहक भर घालते. पद्मिनी, जर, अमिराह आणि महिलांच्या पोशाखांच्या भव्य कलेक्शनपासून ते अमिठी, काविया आणि गंजिफा यांच्या हस्तकलेने प्रेरित होम डेकोर कलेक्शनपर्यंत प्रत्येक घटक सणाच्या आणि उत्सवाच्या मूडला उत्तम प्रकारे पूरक आहे.
वेडिंग कलेक्शन सादर करण्यासोबतच स्टाइलिस्ट मनदीप कौरने नव्या कलेक्शनमधील शोभेच्या वस्तूंनी पाहुण्यांना सुंदर मेकओव्हर दिला.
*कलेक्शनची ठळक वैशिष्ट्ये*
अमिराह – हे हिवाळ्यासाठी खास तयार करण्यात आलेले कुर्ते आहेत. मरून, नेव्ही आणि ब्लॅक या शाही छटांमधील कुर्त्यांवर सुंदर ड्रेप आणि चकाकी आहे. टफ्टेड वेलवेटमधील या कुर्त्यांवर मोगल काळातील प्रतीके आणि हाताने मरोदी व जरीकाम केले असून एखाद्या दागिन्यासारखी श्रीमंती या कुर्त्यांमधून झळकते.
जर – नाजूक पातळ चंदेरीतील पारंपरिक उत्सवी सिल्हाउटच्या या हाताने तयार करण्यात आलेल्या कलेक्शनला सोनेरी जरी कामाच्या भव्यतेने प्रेरित केले आहे. कट-दाना तंत्रूने केलेल्या हाती भरतकामाने या बारीक नक्षीकामाच्या सौंदर्यात भरच पडते. या कलेक्शनमध्ये टिश्यु फॅब्रिकवरील हँड-कट दाना भरतकाम आहे.
पद्मिनी – प्राचीन मेवाड भागातील राणी पद्मिनीच्या शाही राजपुती पोशाखांपासून प्रेरणा घेऊन हे रंगीबेरंगी भारतीय छटांमधील उत्सवी कलेक्शन तयार करण्यात आले आहे. प्रत्येक भरतकामात पारंपरिक व समकालीन तंत्रांची सांगड घालण्यात आली असून ओरिगामी घडी तंत्राचा वापर करून या कापडावर गोटा पट्टी लावण्यात आली आहे.
या ऋतूचे रंग चमकदार उत्सवी समारंभांसाठी सिरॅमिकमध्ये आणि गंजिफा प्रिंट कटलरीमध्ये कैद केले आहेत. या स्मरणीय भेटवस्तू ठरतात. या रेंजमध्ये नाजूक पोर्सेलिन टेबल आणि सर्व्हवेअरचा समावेश आहे, ज्यावर मोगल-प्रेरित प्रतीके आहेत जी शाही सोहळे व जल्लोषाला जागृत करतात.
जयपोर, आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेलच्या बिझनेस हेड रश्मी शुक्ला म्हणाल्या,”या लग्नाच्या हंगामात आमचे नवे विंटर वेडिंग कलेक्शन सादर करताना जयपोर अत्यंत रोमांचित आहे. पुरुष व महिलांसाठी शाही पेहेराव व अॅक्सेसरींची वैविध्यपूर्ण व विस्तृत श्रेणी हे या कलेक्शनचे वैशिष्ट्य आहे. कारागीरांनी घडवलेल्या होमवेअर कलेक्शनसह उत्सवी हंगामासाठी हे कलेक्शन खास तयार करण्यात आले आहे. त्यामुळे या समारंभांच्या हंगामासाठी हा परफेक्ट गिफ्टिंग पर्याय आहे.”
नव्या वेडिंग कलेक्शनची किंमत ६९९० रुपयांपासून सुरू होते.हे कलेक्शन भारतातील सर्व दुकाने आणि https://www.jaypore.com/ या वेबसाइटवर ऑनलाइन उपलब्ध आहे.

 197 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.