इशान खांडेकरच्या नाबाद शतकामुळे सुलोचना सिंघानिया विजयी

इशानने नाबाद ११८ धावांची तडाखेबंद खेळी करत संघाला एकहाती विजय मिळवून दिला.

ठाणे : सलामीचा फलंदाज इशान खांडेकरच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर ठाण्याच्या सुलोचना सिंघानिया स्कुलने अंजुमन इस्लाम स्कुलचा दहा विकेट्सनी दणदणीत पराभव करत मुंबई शालेय क्रिडा संघटना आयोजित १४ वर्ष वयोगटाच्या गाईल्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत स्थान मिळवले.
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अंजुमन इस्लाम स्कुलने २०५ धावांचे आव्हान प्रतिस्पर्धी संघसमोर उभे केले. त्यांच्या आरव शर्माने अर्धशतक पूर्ण करत ६७ धावांचे योगदान दिले. देवांश शिंदेने तीन, विहान जाजुने दोन, शिवम चव्हाण, अरीन चुबल, अद्वैत कचराज आणि अनिश नायरने प्रत्येकी एक विकेट मिळवली. उत्तरादाखल इशानने नाबाद ११८ धावांची तडाखेबंद खेळी करत संघाला एकहाती विजय मिळवून दिला. त्याचा सलामीचा जोडीदार अद्वैत कचराज २५ धावांवर नाबाद राहिला.

 28,224 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.