गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करा

जास्तीत जास्त लसीकरणावर भर देण्याच्या महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या सूचना

ठाणे : गोवर या आजाराचे रुग्ण आढळल्यास त्यांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी  सातही दिवस ओपीडी सुरू ठेवा. मुंब्रा परिसरात ठिकठिकाणी लसीकरणाची  मोहिम हाती घेवून ज्या बालकांचे लसीकरण झाले नाही त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करा, तसेच आरोग्य केंद्रात उपचार दिले जात आहेत असा विश्वास नागरिकांच्या मनात निर्माण करा अशा सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
मुंब्रा परिसरातील गोवर आजाराच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त बांगर यांनी  कौसा रुग्णालय येथे बैठक घेतली. या बैठकीस, उपायुक्त मनीष जोशी, वैद्यकीय अधीक्षक अनिरुद्ध माळगावकर, नागरी आरोग्य केंद्र समन्वयक डॉ. राणी शिंदे, मुंब्रा विभागातील आरोग्य अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुंब्रा विभागात गोवरचा प्रादुर्भाव दिसून येत असून आजपर्यत एकूण ५४ रुग्ण संशयित रुग्ण् आढळले आहे, ही बाब जरी गंभीर असली तरी गोवर या आजाराबाबत नागरिकांनी  घाबरुन जाण्याची गरज नाही. एक वर्षापर्यत ज्या बालकांमध्ये गोवरची लक्षणे आढळून येत आहेत त्यांची तपासणी बालरोगतज्ज्ञांमार्फत होणे आवश्यक आहे. जर बालरोगतज्ज्ञ नसतील तर वैदयकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करावी, जेणेकरुन गोवर या आजाराची तीव्रता आढळल्यास त्याच्यावर तातडीने उपचार होतील. सर्व आरोगय केंद्रामध्ये वैदयकीय तपासणीसाठी आरोगय अधिकारी ही तीन पाळयामध्ये उपलब्ध असतील अशा पध्दतीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी सर्व वैदयकीय आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या.
आशा वर्कर्सना देखील संशयित रुग्णांवर देखरेख ठेवण्याच्या सूचना शासनाकडून प्राप्त् झाल्याआहेत,  जेणेकरुन गोवरचे संशयित रुग्णांवर नियंत्रण ठेवता येणार आहे, त्यांच्याजवह शून्य ते पाच या वयोगटातील सर्व बालकांची यादी उपलब्ध असते. आशा सेविकांनी सर्व बालकांचा पाठपुरावा करून गोवर असेल तर नागरी आरोग्य केंद्रात त्याची माहिती द्यावी. मार्फत आढावा घेण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. खाजगी डॉक्टरांनाही गोवरबद्दल खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. गोवर सदृश लक्षणे असलेला रुग्ण आला तर त्या रुग्णाच्या नातेवाईकांचा मोबाईल नंबर आपल्या कार्यक्षेत्रातील नागरी आरोग्य केंद्राकडे लगेच द्यावा. आरोग्यकेंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी खाजगी डॉक्टरांकडून प्राप्त झालेल्यांची यादी तयार करुन त्यांच्याशी फोनवर संपर्क साधण्याच्या सूचना दिल्या.
गोवरचा प्रादुर्भाव हा फेब्रुवारीपर्यत राहू शकतो, परंतु आता जो प्रादुर्भाव वाढत आहे, त्याची साखळी तोडणे महत्वाचे आहे, यासाठी बालकांचे नियमित लसीकरण होणे गरजेचे आहे, अन्यथा ही साखळी वाढण्याचीही शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
लसीकरण मोहिम तीव्र करण्यासाठी लोकप्रतिनिधीचा सहभाग घ्या.
गोवर या आजाराचा सामना करण्यासाठी लसीकरण मोहिम अधिक व्यापक प्रमाणात राबविणे गरजेचे आहे, यासाठी विशेष लसीकरणाचे कॅम्प आयोजित करुन जास्तीत जास्त  बालकांचे लसीकरण होईल या दृष्टीने नियोजन करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक स्ंस्थाचा सहभाग घ्या असेही त्यांनी सांगितले.
चारही आरोग्यकेंद्रात रुग्ण्वाहिका ठेवा.
मुंब्रा येथील चारही आरोग्य केंद्रामध्ये २४ तास रुग्ण्वाहिका ठेवा, जेणेकरुन एखादा गंभीर रुग्ण आल्यास त्याला तात्काळ उपचारार्थ रुग्णालयात नेणे सोईचे होईल.
घरोघरी सर्वेक्षणाची दुसरी फेरी सुरू
गोवरचे रुग्ण शोधण्यासाठी दुसरी सर्वेक्षणाची फेरी कौसा, मुंब्रा, कळवा येथे सुरू झाली आहे. या सर्वेक्षणात  गोवरची लक्षणे आहेत अशी सगळी मुले शोधता येतील. तसेच ज्यांचे लसीकरण झालेले नाही अशीही मुले आढळतील असेही बांगर यांनी नमूद केले.
अंगणवाडयामध्ये विशेष लसीकरण मोहिम राबवा
अंगणवाडीमध्ये येणाऱ्या बालकांसाठी त्या ठिकाणी विशेष लसीकरण शिबीर आयोजित केल्यास ज्या बालकांचे लसीकरण झालेले नाही त्यांचे लसीकरण होण्यास मदत होईल. बालक कुपोषित असेल तर त्याला रुग्णालयात दाखल करुन अतिरिक्त आहार द्या. अंगणवाडी सेविकांनीही घरोघरी जावून सर्वेक्षण करा अशा सूचनाही बांगर यांनी दिल्या.

 14,078 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.