नवी मुंबईत प्रथमच  आंतरराष्ट्रीय वैद्यकीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न



२० राज्यातील तज्ञ डॉक्टर झाले होते सहभागी

नवी मुंबई, ठाणे : इंटरनॅशनल मेडिकल सायन्सेस अॅकॅडमी (IMSA) व तेरणा मेडिकल कॉलेज तसेच तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर यांच्या संयुक्त विद्यमाने ३९ व्या वार्षिक वैदकीय परिषदेचे (इमसाकॉन) आयोजन नेरुळ येथिल तेरणा नॉलेज सिटीमध्ये असलेल्या प्रशस्त ऑडिटोरिम मध्ये केले होते. या परिषदेला जम्मु काश्मीर ते तामिळनाडू येथील खासगी तसेच सरकारी हॉस्पिटलमधील शल्यचीकित्सक, वैदकीय तपासणी विशेषतज्ञ, वैद्यकीय हॉस्पिटलचे प्रोफेसर तसेच सामाजिक संस्थेमधील अधिकारी यांनी सहभाग घेतला होता. या वैद्यकीय परिषदेला स्कॉटलँड येथिल ग्लासगो शहरातील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन ऑफ ग्लासगो यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते. या कॉलेजमधील वैद्यकीय तज्ज्ञांनी इंटरनेटच्या माध्यमातून या परिषदेतील डॉक्टरांशी संवाद साधला. इंटरनॅशनल मेडिकल सायन्सेस यांची स्थापना १९८१ मध्ये वैश्विक संस्था म्हणून सार्वत्रिक आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीकोनातून करण्यात आली असून याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.  सुमारे तीन दशकांपूर्वी सुरू झाल्यानंतर अकादमीने आपल्या मूळ उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी बराच मोठा पल्ला गाठला आहे.  आज ही शैक्षणिक आणि सामाजिक प्रासंगिकता टिकवून ठेवणारी बायोमेडिकल सायन्सेसमधील प्रतिष्ठित संस्थांपैकी एक आहे.
उत्तम सार्वभौमिक आरोग्याची दृष्टी पूर्ण करण्यासाठी या संस्थेकडे त्रिपक्षीय दृष्टीकोन आहे.  बायोमेडिकल संशोधन, वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सेवा वितरण हे त्याच्या मिशनचे तीन मुख्य घटक आहेत.  भौगोलिक सीमांशिवाय आरोग्य सेवांमध्ये उच्च स्तरावरील मानकांची उत्पत्ती, विकास, स्थापना आणि प्रसार करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
याविषयी अधिक माहिती देताना तेरणा मेडिकल कॉलेजच्या सर्जरी विभागाचे प्रमुख तसेच इमसाकॉन वैद्यकीय परिषदेचे सचिव आयोजक डॉ. ज्ञानेश बेलेकर म्हणाले, ही परिषद वैद्यकीय तज्ज्ञांची पूर्ण व्याख्याने, सिम्पोझिया, कार्यशाळा, वैद्यकीय सत्रे आणि मौखिक आणि ई-पोस्टर सत्रांद्वारे विविध वैशिष्ट्यांमधील संशोधन आणि विकासावर लक्ष केंद्रित करणारी होती. सतत वैद्यकीय शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रूग्णांचा समावेश असलेल्या विविध विकारांना कसे सामोरे जावे यासाठी तथ्ये आणि कल्पनांची देवाणघेवाण करण्यास प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट होते.  या शैक्षणिक मेजवानीत विविध अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय वैद्यकीय विद्याशाखा सहभागी होत्या आणि त्यांचे विपुल अनुभव त्यांनी उपस्थितांसमोर मांडले. वैद्यकीय ज्ञान हे अथांग आहे व ते वैद्यकीय तज्ञांसमोर मांडल्यावर त्या ज्ञानाचा उपयोग हा रुग्ण वाचविण्यासाठी होतो याच तत्वावर ही परिषद आयोजित केली होती”

 1,069 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.