आनंदयात्री फेसबुक समूहाची रंगणार क्रिकेट स्पर्धा

महाराष्ट्र, गुजरातमधील ३२ संघ विजेतेपदासाठी भिडणार

ठाणे : सोशल मीडियाच्या माध्यमातून आज अनेक समूह सक्रिय आहेत, त्यात आपल वेगळेपण सिद्ध करणारा एक समूह म्हणजे आनंदयात्री, नावातच आनंद असणारा, प्रत्येकाच्या जीवनात कुठल्या न कुठल्या स्वरूपाचा आनंद देणारा समूह म्हणजेच आनंदयात्री. या आनंदयात्री समूहाची टर्फ क्रिकेट स्पर्धा यंदा ठाण्यात रंगणार आहे. एस पी इंटरप्रायझेस आयोजित स्पर्धेतील सामने बाळकूम येथील लेनो स्पोर्ट्स क्लबच्या टर्फ मैदानावर १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान खेळवण्यात येतील. गतवर्षीच्या तुलनेत यंदा संघांची संख्या वाढली असून, महाराष्ट्र आणि गुजरातमधील सुमारे ३२ संघ विजेतेपदासाठी लढतील. गतवर्षी पुण्यात झालेल्या पहिल्या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी झाले होते.
आनंदयात्री फेसबुक समूहाचे राम चिंचलिकर आणि शुभदा कुलकर्णी ताकभाते हे संस्थापक असून आठ हजारच्या वर यांचे सभासद आहेत, जात धर्म पंथ लिंग वय प्रतिष्ठा या पैकी कुठलेही भेदभाव न करता, चार क्षण विरंगुळ्याचे तसेच सामाजिक उपक्रम राबवून आनंदयात्रीचे सभासद गेली दोन वर्ष त्यांचा प्रवास करत आहेत,
फेसबुक तसच व्हॉट्सऍप च्या माध्यमातून विविध स्पर्धा, टास्क यांच्या बरोबरीने क्रिकेट स्पर्धा आणि एकांकिका स्पर्धा ही घेण्यात येतात, संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच गुजरात राज्यांमधून ही या स्पर्धाना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो, आनंदयात्री मधील बरेच सभासद व्यावसायिक उद्योजक ही आहेत, उद्योजकांना प्रोत्साहन म्हणून स्टॉलचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

 43,833 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.