तुर्भा येथील ७० कर्मचाऱ्यांना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरतर्फे सीपीआर ट्रेनिंग

ह्रद्यविकाराच्या झटक्यानंतर तात्काळ उपचार मिळणे गरजेचे आहे. तीव्र झटक्यानंतर श्वास चालू नसणार्‍या रुग्णाला सीपीआर म्हणजेच कार्डियो पल्मोनरी रिसिटेशन (CPR)  मदतीचे ठरते. यामुळे रक्ताभिसरण आणि श्वसन नियमित होऊन पुढील मदत मिळेपर्यंत ती व्यक्ती जिवंत राहण्याची शक्यता वाढते,

ठाणे – नवी मुंबई : वाढता ताणतणाव, जीवनशैली व खाद्य संस्कृतीत झालेला बदल यामुळे वयाची तिशी पूर्ण होण्याच्या आत मधूमेह, रक्तदाब आणि हृद्यविकार अशा समस्यांचा धोका वाढला आहे. ह्रद्यविकाराच्या झटक्यानंतर तात्काळ उपचार मिळणे गरजेचे आहे. कारण झटक्यानंतर हॉस्पिटला पोहचण्यापर्यंतचा प्रत्येक मिनिट त्या व्यक्तीसाठी गरजेचा असतो. तीव्र झटक्यानंतर श्वास चालू नसणार्‍या रुग्णाला सीपीआर म्हणजेच कार्डियो पल्मोनरी रिसिटेशन (CPR)  मदतीचे ठरते. यामुळे रक्ताभिसरण आणि श्वसन नियमित होऊन पुढील मदत मिळेपर्यंत ती व्यक्ती जिवंत राहण्याची शक्यता वाढते, याच जाणिवेतून नेरुळ येथिल तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरने तुर्भे येथील सेंट्रल वेअर हाऊसिंग कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी सीपीआर ट्रेनिंगचे आयोजन केले होते. तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्या डॉ. सुनीता नायक व डॉ. आशावरी वाघ यांनी ७० हुन अधिक कर्मचाऱ्यांना सी पी आर प्रशिक्षण दिले. पण प्रत्येक व्यक्तीला बेसिक लाइफ सपोर्ट बद्दल जुजबी माहिती असणं गरजेचं आहे. आणि सीपीआर शिकणं, हे वाटतं तितकं अवघडही नाही.प्राणवायूचा पुरवठा थांबल्यापासून ४ ते ६ मिनिटांत मेंदूला इजा सुरू होते आणि अवघ्या आठ मिनिटात मृत्यू ओढवू शकतो. अचानक कोसळलेल्या व्यक्तीला त्वरित सीपीआर मिळाला तर जीव वाचण्याची शक्यता वाढते.कसलंही वैद्यकीय शिक्षण न घेतलेल्या व्यक्तीने सुद्धा अशा प्रसंगी सीपीआर दिला तरी चालतो. प्रगत देशांमध्ये प्रत्येक पालकाला, नर्सरी किंवा प्रि-स्कूल चालवणार्‍या शिक्षकांना, पोहणं शिकवणार्‍या शिक्षकांना बेसिक लाइफ सपोर्टचे शिक्षण घेण्याचा सल्ला दिला जातो,काहीवेळा असं शिक्षण अनिवार्यही असू शकतं परंतु भारतामध्ये याबाबत अजूनही जागरूकता आलेली नाही याच सामाजिक भावनेतून तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर गेली अनेक वर्षे सीपीआर ट्रेनिंगचे आयोजन करीत आहेत यामध्ये खाजगी कंपनी, सरकारी संस्था तसेच नवी मुंबईतील महाविद्यालयात सीपीआर ट्रेनिंग दिले असून यामध्ये हजारो नागरिक या कार्यक्रमात प्रशिक्षित झाले आहेत. तुर्भे येथिल सेंट्रल वेअर हाऊसिंग कंपनीचे रिजिनल हेड निर्मल यांनी यावेळी तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्या डॉक्टरांचे आभार मानले. हृदयविकारानंतर जगभरात जास्त मृत्यू पहिल्या एक दोन तासांत योग्य उपचार वेळेत न मिळाल्याने होतात. त्यात चुकीचा सल्ला देणारे शेजारी असतात. हृदयविकाराचा झटका आल्यास संबंधित व्यक्तीला त्वरित हॉस्पिटलमध्ये नेणे व त्या दरम्यान प्रथमोपचार मिळणे हे अतिशय महत्त्वाचे ठरते. त्यामुळे ४० टक्के पेशंटचे प्राण वाचू शकतात अशी माहिती तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरचे हृदयविकार तज्ञ डॉ. तमिरुद्दीन दानवडे  यांनी दिले.

 54,237 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.