मध्य रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाबद्दल खासदार श्रीकांत शिंदेंना निवेदन

रेल्वे प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची केली मागणी

मुंबई, ठाणे : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबई येथील वर्षा बंगला येथील निवासस्थानी रेल्वे तसेच विविध विषयावर चर्चा करण्याकरिता सेंट्रल रेल्वे ठाणे स्टेशन सल्लागार समिती सदस्य अमोल कदम यांनी भेट घेतली. याप्रसंगी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सोमवार ७ नोव्हेंबर रोजी लोकल वर झालेल्या दगड फेक घटने प्रकरणी दोन घटनेत तीन प्रवासी जखमी झाले होते. यामुळे मध्य रेल्वे आरपीएफ आयुक्त ऋषी कुमार शुक्ला यांना सेंट्रल रेल्वे ठाणे स्टेशन सल्लागार समिती सदस्य अमोल कदम यांनी निवेदन दिले होते. या संदर्भात खासदार श्रीकांत शिंदे यांना देखील निवेदन देण्यात येऊन रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास कसा सुखकर होईल, या संदर्भात मुंबई येथील मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. या वेळी रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होण्याकरिता योग्य सूचना संबंधित रेल्वे विभागाला देण्यात आल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सेंट्रल रेल्वे ठाणे स्टेशन सल्लागार समिती सदस्य अमोल कदम यांच्याशी निवेदन देताना सांगितले.

 38,619 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.