लोकमान्यनगर विभागाचा देखील क्लस्टरच्या माध्यमातून विकास करणार


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
ठाणे : किसन नगर प्रमाणेच लोकमान्यनगर विभागाचा देखील क्लस्टरच्या माध्यमातून विकास केला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही लोकमान्यनगर-शास्त्राrनगर विभागातील रहिवासी नागरिक आणि कार्यकर्ते यांचा दिपावली निमित्ताने कौटुंबिक स्नेह भोजन आनंद मेळावा आयोजित केला होता, या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते, त्यावेळी बोलतांना त्यानी ग्वाही दिली.
क्लस्टरबाबत ज्या काही अडचणी होत्या त्या नगर विकास मंत्री असताना सर्व दूर केल्या आहेत. त्यामुळे ही योजना राबविण्यास आता कोणतीही अडचण नाही असेही ते यावेळी म्हणाले.
माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी यावेळी केलेल्या प्रास्ताविक भाषणात लोकमान्यनगर विभागाचा देखील क्लस्टरच्या माध्यमातून विकास करण्याची मागणी केली, त्याला अनुसरून मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात ही मागणी मान्य केली.
प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्या हस्ते चांदीची गदा देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले.
माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या या आनंद मेळाव्याला लोकमान्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला ठाकूर, मा. नगरसेवक राम रेपाळे, दिगंबर ठाकूर, योगेश जानकर व विजय पडवळ, माजी नगरसेविका.राधाबाई जाधवर, नगरसेविका वनिता घोगरे, माजी परिवहन सदस्य संतोष पाटील, ब्लॉक अध्यक्ष सुधाकर नाईक, माजी नगरसेवक संभाजी पंडित, प्रमुख सहकारी प्रशांत (राजा) जाधवर, संदिप घोगरे, पुरुषोत्तम (पप्या) ठाकूर, प्रभागातील सर्व वॉर्डाध्यक्ष, महिला वॉर्डाध्यक्षा, युवक अध्यक्ष, विविध सेल चे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकमान्यनगर, शास्त्रीनगर विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रविवारद, ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी आर. जे. ठाकूर कॉलेज श्रीमती इंदिरा गांधी महाविद्यालय, सावरकरनगर येथे हा मेळावा संपन्न झाला.

 2,076 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.