ग्रीष्मा थोरातला वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक

मोदीनगर, उत्तर प्रदेश येथे सुरू असलेल्या महिला खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये (यूथ १७ वर्षाखालील) ८१ किलो वजनी गटात स्नॅच ६७ किलो आणि क्लीन एंड जर्क ९० एकूण १५७ किलो उचलले वजन.

ठाणे : ठाण्याच्या १४ वर्षे वयाच्या ग्रीष्मा थोरात हिने राष्ट्रीय खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये रौप्य पदकाची कमाई केली आहे.
अश्वमेध वेटलिफ्टिंग फाऊंडेशन, ठाणेची खेळाडू ग्रीष्मा यतिन थोरात हिने मोदीनगर, उत्तर प्रदेश येथे सुरू असलेल्या महिला खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये (यूथ १७ वर्षाखालील) ८१ किलो वजनी गटात स्नॅच ६७ किलो आणि क्लीन एंड जर्क ९० एकूण १५७ किलो वजन उचलून दुसरा क्रमांक पटकावला आहे. कमी वयात वडिलांच्या मृत्यूचा धक्का पचवून आपल्या कष्टाने मेहेनतीने ग्रीष्माने हे यश मिळवले आहे. राष्ट्रीय स्तरावरील तिचे हे पहिले पदक आहे. तिला शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या मधुरा सिंहासने व वेटलिफ्टींग प्रशिक्षक दत्तात्रय टोळे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच अश्वमेध वेटलिफ्टिंग फाउंडेशनचे सहकार्य लाभले.

 90,868 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.