स्टेडफास्ट न्यूट्रिशनतर्फे भारतात प्रथमच प्रो शोचे आयोजन

विजेत्यांना मि. ऑलिम्पिया या प्रतिष्ठित स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार

मुंबई : भारतात पहिल्यांदाच स्टेडफास्ट न्यूट्रिशन या भारतीय ब्रॅंडद्वारे प्रो शोचे आयोजन करण्यात आले आहे. ही भारतीय बॉडीबिल्डिंगच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना आहे. स्टेडफास्ट न्यूट्रिशन या देशातील झपाट्याने वाढत असलेल्या स्पोर्ट्स न्यूट्रिशन ब्रॅंडने ही स्पर्धा शेरू क्लासिकच्या भागिदारीत प्रायोजित केली आहे. चार विजेत्यांना मि. ऑलिम्पिया या जगातील अत्यंत मोठ्या बॉडीबिल्डिंग स्पर्धेचे तिकीट मिळेल.
स्टेडफास्ट न्यूट्रिशनचे संस्थापक अमन पुरी यांनी सांगितले की, भारतीय अॅथलीट्सना त्यांची स्पर्धात्मक कारकीर्द पुढे नेण्याची आणि बॉडीबिल्डिंगला कारकीर्दीचा एक लाभदायक पर्याय बनवण्याची संधी देण्याच्या उद्देशाने आपण हा महागडा इव्हेंट भारतात आणला आहे.
अमन पुरी पुढे म्हणाले, “बहुतांशी बॉडीबिल्डिंग अॅथलीट्सचे ध्येय मि. ऑलिम्पियामध्ये सहभागी होण्याचे असते. बॉडीबिल्डिंग भारतात लोकप्रिय होत चालले आहे, पण अजूनही ते लाभदायक कारकीर्दीचा पर्याय बनलेले नाही. एक प्रो शो भारतात योजून भारतीय बॉडी बिल्डर्सना मि. ऑलिम्पियामध्ये थेट प्रवेश मिळवण्याची संधी आम्ही देऊ इच्छितो, जे काम एरवी खूप जिकिरीचे असते. विजेत्यांसाठी प्रायोजकता आणि जाहिराती मिळवण्याची ही मोठी संधी आहे, ज्याच्यामुळे आपल्या देशात बॉडीबिल्डिंग अधिक लोकप्रिय होईल, तो मुख्य प्रवाहातील खेळ बनेल, ज्यामुळे अॅथ्लीट्स चांगले पैसे कमावतील आणि त्यांना जागतिक ओळख देखील मिळेल.”
हा प्रो शो इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग (जे जगभरातील बॉडी बिल्डिंग इव्हेंटवर देखरेख ठेवते) आणि नॅशनल फिजिक कमिटी (NPC- जी नॅशनल फिजिक कमिटी ऑफ USA ची एक आंतरराष्ट्रीय हौशी शाखा आहे)च्या अधिपत्याखाली आयोजित करण्यात आला आहे.
केवळ प्रो शोज जिंकणारे अॅथलीट्सच मि.ऑलिम्पिया या अत्यंत प्रतिष्ठित स्पर्धेत सहभागी होण्यास पात्र ठरतात. मि. ऑलिम्पिया स्पर्धा जिंकणे हे प्रत्येक बॉडीबिल्डरचे स्वप्न असते. प्रो शोज हौशी अॅथलीट्सना व्यावसायिक वर्तुळात प्रवेश करण्याची संधीही देतात. फक्त प्रो किंवा व्यावसायिक अॅथलीट्सच बक्षिसाच्या रकमेसाठी स्पर्धा करू शकतात.

 211 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.