विजयवाडा येथील रहिवासी एका ३५ वर्षाच्या महिलेला ह्रदयाचा कार्डिओ मायोपॅथी (हाइपरट्रॉफिक ऑब्सट्रक्टिव कार्डियोमायोपॅथी) नावाचा आजार झाला होता. या आजाराचे २०१० मध्ये निदान झाले होते.
चेन्नई : तामिळनाडू राज्यात चांगली आरोग्यसेवा देण्यास सज्ज असलेल्या आघाडीच्या कावेरी ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या चेन्नईच्या कावेरी हॉस्पिटलमध्ये ह्रदयाच्या कार्डिओ मायोपॅथी नावाचा गुंतागुंतीच्या आजाराच्या एका ३५ वर्षाच्या महिलेवर ह्रदय प्रत्यारोपण यशस्वी करण्यात आले. कार्डिओ मायोपॅथी हा असा आजार आहे की ज्यामुळे ह्रदयाला होणाऱ्या रक्तपुरवठा खंडित होऊन ह्रदयाचे पंपिंग होण्याचे प्रमाण कमी होते.
प्रत्यारोपणासाठी वेल्लोर या सरकारी रुग्णालयात ब्रेन डेड(मेंदूमृत) रुग्णाचे अवयव उपलब्ध झाले. अवयवदान मोहिमेंतर्गत वेल्लोर जीएच सरकारी रुग्णालयातून कावेरी रुग्णालय चेन्नई पर्यंत एक ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. उपलब्ध झालेले अवयव एक तास १५ मिनिटाच्या आत रुग्णालयात पोहोचले.
विजयवाडा येथील रहिवासी एका ३५ वर्षाच्या महिलेला ह्रदयाचा कार्डिओ मायोपॅथी (हाइपरट्रॉफिक ऑब्सट्रक्टिव कार्डियोमायोपॅथी) नावाचा आजार झाला होता. या आजाराचे २०१० मध्ये निदान झाले होते. चार वर्षांनंतर त्यांनी एका बाळाला जन्म दिला होता. परंतु, सातत्याने थकल्यासारखे होणे, ह्रदयाचे ठोके वाढणे,श्वास घेण्यास त्रास होणे यासारखी लक्षणे दिसत होती. संपूर्ण गर्भावस्थेत सुद्धा त्यांची काळजी घेण्यात आली.
देशातील अनेक रुग्णालयात त्यांनी उपचार घेतले. परंतु २०१५ मध्ये त्यांनी कावेरी रुग्णालयाच्या एका वरिष्ठ ह्रदयरोग तज्ञांची भेट घेतली. त्यावेळी रुग्णाची प्रकृती खालावली होती. ह्रदयाच्या कार्यात अडथळा येऊ लागला होता. ह्रदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या मुख्य पंपिंग चेंबरचा (झडप) आकार मोठा झाल्याने ह्रदयाचे पंपिंग होणे अवघड होऊ लागले. त्यावेळी ह्रदय प्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला होता. त्याशिवाय त्यानी कावेरी रुग्णालयाच्या ह्रदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण विभागाच्या तज्ञांकडे पाठविण्यात आले. प्रत्यारोपणाची प्रतीक्षा यादीत असलेल्या रुग्णांच्या यादीत त्या महिलेचे नाव अग्रस्थानी नोंदविण्यात आले. त्यानंतर अवयवाचा शोध सुरू करण्यात आला.
अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया ही चार तास चालली. यशस्वी प्रक्रिया झाल्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागातून बाहेर काढण्यात आले. आता त्यांची प्रकृती उत्तम झाली आहे. प्रकृती सुधारल्यानंतर या महिला रुग्णाने कावेरी रुग्णालयाचे ब्रँड आंबेसिडर असलेले आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कप्तान एम. एस. धोनी यांचे काढलेले चित्र त्यांनी सुपूर्द करीत त्यांचे आभार मानले.
डॉ. मनिवन्नन सेल्वाराज मॅनेजिंग डायरेक्टर, कावेरी ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स म्हणाले, अवयव प्रत्यारोपण ही लोकांचे प्राण वाचविण्याची प्रक्रिया आहे. अनेकांना सध्या ह्रदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण करण्याची गरज आहे. सध्या हळूहळू नागरिकांमध्ये आता अवयव दान याबाबत जनजागृती वाढली आहे. आम्ही आतापर्यंत पाहत आलो आहोत की अनेक कुटुंब आपल्या प्रियजनांच्या मृत्यूनंतर त्यांचे अवयवदान करण्यासाठी पुढे आले आहेत. अवयवदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी डॉक्टर, सर्जन, भुलतज्ञ, नर्स आणि समन्वयक यांची गरज असते. ह्रदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण प्रक्रिया ही अंत्यत किचकट अशी प्रक्रिया आहे. स्पेशालिस्ट डॉक्टरांची टीम काळजीपूर्वक या प्रक्रिया पूर्ण करतात. आमच्या रुग्णालयात स्पेशालिस्ट डॉक्टरसोबत अत्याधुनिक यंत्र, उपकरणे आहेत. या माध्यमातून आम्ही यशस्वीरीत्या कोणत्याही प्रकारच्या प्रत्यारोपणाची प्रक्रिया पूर्ण करतो आणि यापुढे ही करत राहू. त्यावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत.’
डॉ. अरविंदन सेलवराज सह संस्थापकांनी कार्यकारी संचालक, कावेरी ग्रुप ऑफ हॉस्पिटल चेन्नई म्हणाले , आमच्या रुग्णालयाच्या प्रत्यारोपण तज्ञांच्या टीमच्या मदतीमुळे ह्रदय आणि फुफ्फुस यांच्या गुंतागुंतीच्या रुग्णांना त्यांच्या प्रकृतीमुळे आयुष्याशी झगडावे लागते. त्यांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. चेन्नईच्या या प्रत्यारोपण केंद्रात एक ऑपरेशन कक्ष ज्यामध्ये अंत्यत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक आधुनिक साधने आहेत. डॉ. कुमुद कुमार धितल कावेरी रुग्णालयात ह्रदय प्रत्यारोपण विभाग सांभाळतात. जे देशात प्रसिद्ध असे ह्रदयरोगतज्ञ आहेत.
चेन्नई सुपर किंग्जचे कप्तान आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कप्तान एम.एस.धोनी म्हणाले,’ अवयवदान हे महत्त्वाचे कार्य आहे. यामुळे लोकांचे प्राण वाचविले जातात. आपल्या जवळच्या नातेवाईकाच्या मृत्यूचे दुःख हे निश्चितच त्रासदायक आहे पण एका व्यक्तीच्या अवयवदनामुळे आठ जणांचे प्राण वाचविणे शक्य झाले आहे. परिणामी, लोकांना मदत देणे शक्य झाले आहे. यामुळे काही जणांना दुसरे जीवन मिलनाची संधी मिळते. मी अवयवदान करणाऱ्या कुटुंबाचे आभार मानतो. जे कुटुंब या चांगल्या कामासाठी तयार झाले आहे. कावेरी रुग्णालयाच्या ह्रदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण विभागाचे उदघाटन करण्याची संधी मला मिळाली हे माझे मोठे भाग्य आहे. काही जणांचे प्राण वाचविण्यासाठी ही टीम प्रयत्न करते. त्याचे मी खरोखरच अभिनंदन करतो. कारण, त्यांच्या प्रयत्नाशिवाय हे शक्य नाही. जीवनदान मिळालेल्या रुग्णाकडून स्वतःचा फोटो असलेले पोट्रेट स्वीकारणे हा देखील वेगळा आनंदाचा भाग आहे. याच डॉक्टरांच्या टीममुळे ह्रदय प्रत्यारोपण यशस्वी होऊ शकले आहे.
348 total views, 1 views today