२ री कृष्णाकर टिपणीस स्मृती राज्य मानांकन कॅरम स्पर्धा
ठाणे : सी. के. पी. सोशल क्लब आयोजित कृष्णाकर टिपणीस स्मृती २ ऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला शुक्रवार , २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता सी. के. पी. सभागृह, खारकर आळी, ठाणे पश्चिम येथे सुरुवात होत आहे. पुरुष एकेरी गटात ३३४ खेळाडू तर महिला एकेरी गटात ४४ खेळाडूंनी भाग घेतला आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरीमध्ये अनुक्रमे मुंबईच्या प्रशांत मोरे व रत्नागिरीच्या आकांक्षा कदमला प्रथम मानांकन देण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना एकंदरीत १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके व कृष्णाकर स्मृती चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिशनच्या युट्युब चॅनलवरून या स्पर्धेतील महत्वाच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
स्पर्धेतील मानांकन पुढीलप्रमाणे.
पुरुष एकेरी : १) प्रशांत मोरे, मुंबई २) महम्मद घुफ्रान, मुंबई ३) सिद्धांत वाडवलकर, मुंबई ४) झैद अहमद फारुकी, ठाणे ५) पंकज पवार, मुंबई ६) अभिषेक चव्हाण, रत्नागिरी ७) संदीप दिवे, मुंबई उपनगर ८) संदीप देवरुखकर, मुंबई
महिला एकेरी : १) आकांक्षा कदम, रत्नागिरी २) ऐशा साजिद खान, मुंबई ३) नीलम घोडके, मुंबई ४) प्राजक्ता नारायणकार, मुंबई उपनगर ५) अंजली सिरीपुरम, मुंबई ६) मिताली पाठक, मुंबई ७) चैताली सुवारे, ठाणे ८) समृद्धी घाडीगावकर, ठाणे
32,722 total views, 1 views today