जत तालुक्याचा सर्वांगिण विकास हाच माझा ध्यास

जत तालुका रहिवाशी संघाच्या वतीने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या जात तालुका संपर्कप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल झालेल्या सत्कार समारंभ व स्नेहसंमेलन मेळाव्यात योगेश जानकर यांचे प्रतिपादन

ठाणे : कोणी काय केले याकडे लक्ष न देता जत तालुक्याचा सर्वांगिण विकास हाच माझा ध्यास असून नियोजनबद्ध विकासातून तालुकाच चेहरा-मोहरा कसा बदलत येईल याकडे आपले जास्त लक्ष असणार असे आश्वासन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जात तालुक्याचे नवनिर्वाचित संपर्कप्रमुख योगेश जानकर यांनी येथे दिले.
जत तालुका रहिवाशी संघाच्या वतीने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या जात तालुका संपर्कप्रमुखपदी योगेश जानकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ व स्नेहसंमेलन मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात जत वासीयांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ वकील नानासाहेब मोटे,ॲड प्रकाश पुजारी,ॲड अशोक शिंदे,ॲड वसंत संगोलकर,विजय गंगाधरे,महादेव पवार, शिवाजी पुणेकर, श्रीमंत कट्टमणी,धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष,पत्रकार दिपक कुरकुंडे आदींसह जत तालुक्यातील अनेक गावातील मुंबईत वास्तव्यास असणारे बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
जानकर पुढे म्हणाले कि जत तालुका दुष्काळग्रस्त असल्याने तालुक्याचा विकास जसा व्हायला पाहिजे होता तसा झाला नाही.त्यामुळे सातत्याने वाटत होते कि तालुक्याच्या विकासासाठी आपण काहीतरी केले पाहिजे यासाठी आपण सदरचे पद घेतले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावर जो विश्वास ठेवला आहे तो मी नक्की सार्थ करून दाखवेल. याआधी कोणी काय केले याकडे लक्ष न देता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून तालुक्याचा विकास कसा करता येईल हाच आपला ध्यास असल्याचे सांगून तालुक्याचा पाणी,आरोग्य व युवकांना नोकऱ्यांचा प्रश्न कसा सोडवता येईल याकडे आपण लक्ष देणार असल्याचे योगेश जानकर यांनी यावेळी सांगितले.

 4,535 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.