शौर्या अविनाश अंबुरेला अडथळा शर्यतीत सुवर्णपदक

आगामी सीआयएससीई राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार
मुंबई : १९ व्या सीआयएससीई (Council for Indian School Certificate Exam, New Delhi) राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धा १७ व १८ ऑक्टोबरला मुंबईत घेण्यात आल्या. या स्पर्धेत शौर्या अविनाश अंबुरे हिने ८० मी. अडथळा शर्यतीत यापूर्वीचा स्वतःचाच मीट रेकॉर्ड (१४.७ सेकंद) मोडून नवीन रेकॉर्ड (१४. १ सेकंद) असा प्रस्थापित केला. तिला या कामगिरी साठी सुवर्ण पदक मिळाले. तसेच १०० मी. धावणे स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त केले आहे.
शौर्या ही अविनाश अंबुरे (ठाणे पोलीस उपायुक्त (परिमंडळ १)) आणि रुपाली अविनाश अंबुरे (नवी मुंबई पोलीस उपायुक्त (विशेष शाखा ) यांची कन्या आहे.
शौर्या अंबुरे (वय वर्षे १३) ही युनिव्हर्सल हायस्कुल, ठाणे या शाळेची विद्यार्थिनी आहे. तसेच तिचे ॲथलेटिक्स प्रशिक्षण मागील ७ वर्षापासून एम अकॅडमी, ठाणे येथे सुरु असून प्रशिक्षक अजित कुलकर्णी हे तिचे मार्गदर्शक आहेत. श्री माँ गुरुकुल येथे ती सराव करते.
६ ते ८ ऑक्टोबर रोजी प्रथम १९ व्या सीआयएससीई राज्यस्तरीय
विभागीय ॲथलेटिक चॅम्पियनशीप स्पर्धा मुंबई येथील प्रियदर्शनी पार्क येथे संपन्न झाल्या. सदर स्पर्धेमध्ये मुंबई विभागातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या स्पर्धेत शौर्या अविनाश अंबुरे हिने ८० मी. अडथळा शर्यतीत (१४ वर्षांखालील) यापूर्वीचा १५.९८ सेकंद हा मीट रेकॉर्ड मोडून १४.७ सेकंद असा नवा रेकॉर्ड बनवून सुवर्णपदक प्राप्त केले. तसेच १०० मी. धावणे स्पर्धेत रौप्यपदक मिळवले.
विभागीय स्पर्धेनंतर राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धा १७ व १८ ऑक्टोबरला घेण्यात आल्या. सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील शाळांमधील विभागीय स्तरावर पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत शौर्या अविनाश अंबुरे अडथळा शर्यतीत सुवर्ण तर १०० मी. धावणे स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त केले आहे. या स्पर्धांमध्ये २६०० ॲथलेटने सहभाग घेतला होता.
४ ते ६ नोव्हेंबर दरम्यान बालेवाडी, पुणे येथे होणाऱ्या देशपातळीवरील स्पर्धेमध्ये शौर्या अंबुरे ही आता महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

 16,591 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.