जयपूर रग्ज डाग-रोधक कोटिंग सेवा देखील प्रदान करते, ज्याच्यामुळे कोणतेही द्रव्य रगवर सांडले तरी रग सुरक्षित राहतो. ही डाग-रोधक सेवा जुन्या आणि नव्या ग्राहकांसाठी देण्यात येणारी एक अतिरिक्त सेवा आहे. पण कोणत्याही ब्रॅंडच्या रगवर ते वापरता येऊ शकते.
मुंबई : भारतातील सर्वात मोठे हात-बनावटीचे रग उत्पादक- जयपूर रग्सने जाहीर केले की, लोकप्रिय ठरलेला ‘रग उत्सव- नॉट(knot) सो ऑर्डीनरी’ आता अंतिम टप्प्यात येऊ घातला आहे. कारागीर आणि ग्राहक यांना एकत्र आणण्यासाठी योजलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक ग्राहकांनी गालीचा कसा विणतात याची माहिती मिळवली. त्याचबरोबर, कंपनीच्या रग-विक्रीत देखील लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले. रग उत्सव लवकरच संपत आहे आणि त्यामुळे, हजारो प्रीमियम दर्जाच्या, अनोख्या शैलीच्या, डिझाइनच्या आणि रंगांच्या हाताने विणलेल्या, हँड टफ्टेड, हँडलूम आणि फ्लॅटवीव्ह सतरंज्यांवर मिळत असलेल्या ६०% पर्यंत सवलतीचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांकडे आता फार कमी दिवस शिल्लक राहिले आहेत.
या उत्सवी बोनांझा दरम्यान ऑनलाइन आणि ऑफलाइन ग्राहकांच्या गर्दीत प्रचंड वाढ झाल्याचे आणि देशभरातून मागणी वाढल्याचे निदर्शनास येत आहे. टियर २ शहरातील रसिकांनी प्रीमियम हात बनावटीच्या रग ब्रॅंडप्रती आपले प्रेम व्यक्त करताना विशेष करून सद्यकालीन आणि आधुनिक डिझाईन श्रेणीस आपली पसंती दर्शविली आणि एकंदर विक्रीतला मोठा वाटा उचलला. ग्राहकांना विणकामाचा जिवंत अनुभव फारच आवडला आणि अनेकांनी स्वतः देखील प्रयत्न करून पाहिला.
जयपूर रग्स संपूर्ण भारतात मोफत डिलिव्हरी आणि आपल्या उत्पादनांवर दोन वर्षांपर्यंतची वॉरंटी यांसारख्या मूल्यवर्धित सेवा देते. त्याव्यतिरिक्त डाग-रोधक कोटिंग सेवा देखील प्रदान करते, ज्याच्यामुळे कोणतेही द्रव्य रगवर सांडले तरी रग सुरक्षित राहतो. ही डाग-रोधक सेवा जुन्या आणि नव्या ग्राहकांसाठी देण्यात येणारी एक अतिरिक्त सेवा आहे. पण कोणत्याही ब्रॅंडच्या रगवर ते वापरता येऊ शकते. हा ब्रॅंड इंटिरियर डिझाइनर्स आणि रग विशेषज्ञाकरवी मोफत व्हर्चुअल सल्ला देखील ऑफर करतो, जेणे करून रग आणि कार्पेट विकत घेताना ग्राहक सर्व महितीचा उपयोग करून योग्य निवड करू शकतो.
जयपूर रग्सचे संचालक योगेश चौधरी म्हणाले, “या वर्षीच्या ‘रग उत्सव – नॉट (knot) सो ऑर्डीनरी’ने आम्ही समस्त देशाचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरलो आहोत. केवळ टियर १ शहरांतच नाही तर टियर २ शहरात देखील ऑफलाइन आणि ऑनलाइन गर्दी निदर्शनास आली आहे आणि आमची उत्पादने लोकांना पसंत पडली आहेत. यातून जयपूर रग्स एक डिझाइन उन्मुख सामाजिक दृष्ट्या जागरूक संस्था असल्याच्या विचारधारेची पुष्टी होते.”
ते पुढे म्हणाले, “विविध दुकानांमध्ये आमच्या ग्राहकांना रग बनवण्याचा आणि त्या कारागिरांशी संवाद साधण्याचा प्रत्यक्ष अनुभव खूप भावला. या संपूर्ण रग उत्सवाचा मुख्य उद्देश आमच्या ग्राहकांना आणि कारागिरांना एकत्र आणणे हा आहे, आणि देशभरातून आमच्या उत्पादनांना मिळालेला प्रतिसाद आणि मागणी पाहून आम्हाला आनंद होत आहे.”
302 total views, 2 views today