शिवसेनेच्या (ठाकरे गट) दिवा उपशहर प्रमुखपदी सचिन पाटील यांची निवड

दिवा विभागातील साबे गाव येथील सचिन राम पाटील यांनी शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच राहणार असल्याचा जाहीर पाठींबा दर्शविला होता.

ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निवडणुक चिन्ह मशाल निश्चित झाल्यानंतर सर्वप्रथम निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची नियुक्तीला, नवीन पदासाठी निष्ठावंतांना प्राधान्य देण्यात येत असून आता दिवा उपशहर प्रमुखपदी सचिन राम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेनेचे दोन गट, तसेच निवडणुक आयोगाने दोन्ही गटाला पक्षाचे नाव आणि चिन्हासंदर्भात निर्णय दिल्यानंतर चित्र स्पष्ट झाले आहे. दोन्ही गटांकडून विविध नियुक्त्या सुरु आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने कल्याण लोकसभा मतदार संघात आता पक्षवाढीसाठी नियुक्त्या करताना कठिण काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी जे प्रामाणिक राहीले आहेत अश्या शिवसैनिकांना त्यांनी पदांसाठी प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.
दिवा विभागातील साबे गाव येथील सचिन राम पाटील यांनी शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच राहणार असल्याचा जाहीर पाठींबा दर्शविला होता. त्यानंतर आता माजी आमदार सुभाष भोईर यांच्या शिफारशिनुसार त्यांना दिवा शिवसेना उपशहर प्रमुखपदी निवड केली आहे. तसेच शहर संघटक प्रियांका सावंत ( दिवा प्रभाग क्र २७), योगिता नाईक (दिवा प्रभाग क्र २८) यांचीही त्यावेळी निवड केली गेली. सचिन पाटील हे गेली २० वर्षे शिवसेनेत काम करीत आहेत, ते सुशिक्षितही आहे. वाणिज्य शाखेची पदवी त्यांनी मिळविली आहे. दिवा विभागात काम करताना शिवसेना विद्यार्थी संघटनेचे काम पाहीले, तसेच दिवा शिवसेनेचे शहर संघटक होते. सचिन पाटील यांच्या वहीनी अंकिता पाटील या मुळ शिवसेनेच्या माजी नगरसेविका आहेत. त्यांच्या कौशल्याच्या जोरावर त्यांनी दिवा विभागात विविध विकास कामेही केलेली आहेत.
दिवा विभागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटात सचिन राम पाटील उपशहरप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

 35,791 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.