‘पोटरा’ , ‘तिचं शहर होणं’ , ‘पॉडीचेरी’ , ‘राख’ आणि ‘पल्याड’ या चित्रपटांची निवड

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील फिल्म मार्केट 2022 करिता निवड झाल्याची सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

मुंबई : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील फिल्म मार्केट २०२२मध्ये महाराष्ट्र शासनाकडून पाठवायच्या ५ मराठी चित्रपटांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून पोटरा , तिचं शहर होणं , पॉडीचेरी , राख आणि पल्याड या चित्रपटांची निवड झाल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले आहे.
सदर ५ मराठी चित्रपटांच्या निवडीसाठी ५ तज्ज्ञांची समिती गठीत करण्यात आली होती. या समितीत निर्माती अभिनेत्री किशोरी शहाणे वीज , एफटीआयआय चे धीरज मेश्राम , युनेस्को चे ज्युरी मनोज कदम , चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर , चित्रपट लेखक व दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई यांचा समावेश होता.या समितीने दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे २५ चित्रपटांचे परीक्षण करत या ५ चित्रपटांची निवड केली आहे. हे चित्रपट गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होणार आहेत. या महोत्सवासाठी प्रत्येक चित्रपटाचे दोन प्रतिनिधी या प्रमाणे ५ चित्रपटाचे १० प्रतिनिधी पाठविण्यात येणार आहे.
या चित्रपटांच्या निर्मात्यांचे व संपूर्ण चमुचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे व शुभेच्छा दिल्या आहेत.

 943 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.