पेटीएमचा जना स्मॉल फायनान्स बँकेसोबत सहयोग करार

कार्ड डिवाईस लावण्यासाठी व्यापाऱ्यांमध्ये डिजिटायझेशनला चालना देण्याचा मनसुबा

मुंबई : भारतातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी आणि क्यूआर व मोबाइल पेमेंट्सची अग्रणी कंपनी ब्रॅण्ड पेटीएमची मालकीहक्क असलेल्या वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड (ओसीएल)ने आज देशभरातील व्यापाऱ्यांमध्ये डिजिटायझेशनला अधिक चालना देण्यासाठी कार्ड मशिन्स लावण्याकरिता जना स्मॉल फायनान्स बँकेसोबत सहयोग केल्याची घोषणा केली. या सहयोगासह पेटीएम व जना स्मॉल फायनान्स बँक भारतातील डिजिटल पेमेंट्स क्रांतीला अधिक चालना देईल.
कंपनीच्या कार्ड मशिन्स एकसंधी पेमेंट्ससाठी सर्वोत्तम सोल्यूशन आहेत, ज्यामुळे त्यांच्या व्यापारी सहयोगींना यूपीआय, क्रेडिट, डेबिट कार्डस्, नेट बँकिंग, इंटरनॅशनल कार्डस्, पेटीएम पोस्टपेड, पेटीएम वॉलेट आणि ईएमआयच्या माध्यमातून पेमेंट्स स्वीकारण्यास बहुभाषिक साह्य मिळत आहे. डिवाईसेस त्वरित वॉईस अलर्ट व इन्स्टण्ट सेटलमेंट देखील देतात, ज्यामुळे व्यापारी सहयोगींना अधिक सोयीसुविधा मिळतात.
पेटीएमचे ईडीसी डिवाईसेस आणि ऑल-इन-वन पीओएस डिवाईसेसनी विविध पेमेंट पद्धती, एकीकृत बिलिंग व इन्स्टण्ट सेटलमेंट स्वीकारण्याच्या त्यांच्या सुविधेसह भारतातील डिजिटल पेमेंट्समध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणला आहे. हा सहयोग जना स्मॉल फायनान्स बँकेला त्यांच्या विद्यमान व संभाव्य ग्राहकांना पेटीएमच्या ऑल-इन-वन ईडीसी मशिन्सची सुविधा देण्यास सक्षम करेल, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या सर्व डिजिटल पेमेंट गरजांसाठी एक-थांबा सोल्यूशन मिळेल.

 176 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.