डेल्‍फ्रेजने आपले कार्यक्षेत्र ठाणे, नवी मुंबईत विस्तारले


“शिजवण्यास सोप्या अशा चविष्ट व आरोग्यदायी अन्नपदार्थांना असलेली मागणी आणि ताजे अन्न खाण्याची संकल्पना हळूहळू वाढत आहे. आमच्या समृद्ध परंपरेमुळे कायमच ग्राहकांची त्या त्या वेळेची गरज पूर्ण करणारी उत्पादने देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा उत्पादकाचा दावा

ठाणे : डेल्‍फ्रेज या सुगुणा फूड्सच्या प्रक्रियाकृत अन्नपदार्थ विभागाने आपल्या साखळीतील दुकाने ठाणे व नवी मुंबई येथे सुरू केली आहेत. पोल्ट्री क्षेत्रातील ३० वर्षांहून अधिक अनुभव गाठीशी असलेला हा ब्रॅण्ड अशा प्रकारची एकमेव समृद्ध व स्वच्छतेचा विचार करून तयार करण्यात आलेली मांस उत्पादने देशभरातील ग्राहकांना देऊ करतो.
डेल्‍फ्रेज मांसाहारी पदार्थांची अत्यंत चविष्ट श्रेणी देऊ करतो. यात कोणत्याही प्रिझर्वेटिव्ह्जचा व कृत्रिम घटक पदार्थांचा वापर कटाक्षाने टाळला जातो, आणि लोकांच्या मांसाहाराच्या आवडीचे समाधान सुलभ व कोणत्याही प्रकारे हानीकारक ठरणार नाही अशा पद्धतीने केले जाते. डेल्‍फ्रेज तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ताज्या चिकन कट्समधून हवा तो, हव्या त्या प्रमाणात निवडण्याचा पर्याय देते. ग्राहकांच्या गरजेनुसार प्रत्येक पीस समान भागांत कापलेला असतो.
डेल्‍फ्रेजने ताज्या मांसासाठी नव्याने लाँच केलेल्‍या व्हॅक्युम सील्ड पॅकेजिंगमुळे स्थानिक लोकांना आवडणारे कट्स व पोर्शन्स देणे शक्य होत आहे. ब्रॅण्डने चिकन व मटनाचे अनेक चवदार रेडी-टू-इट व रेडी-टू-इट पदार्थ व मॅरिनेड्सही (मसाल्यात मुरवून ठेवलेले मांस) बाजारात आणले आहेत. रेडी-टू-इट विभागांत चिकन नगेट्स, चिकन पॉपकॉर्न, चिकन कॉकटेल सॉस आदींचा समावेश होतो. रेडी-टू-कूक विभागात मॅरिनेटेड ग्रिल्ड चिकन, मॅरिनेटेड चिकन हॉट अँड स्पायसी करी कट, मॅरिनेटेड चिकन लॉलीपॉप आणि अन्य पदार्थांचा समावेश होतो. याशिवाय डेल्‍फ्रेज अव्वल दर्जाच्या मूल्यवर्धित अंड्यांचाही पुरवठा करते. सेलेनिअम, जीवनसत्वे व क्षार अशा घटकांद्वारे या अंडयांचे पोषणमूल्य वाढवले जाते. यामुळे ग्राहकांना पोषणमूल्य तर चांगले मिळतेच, शिवाय विशिष्ट कार्यात्मक लाभही मिळू शकतात.
सुगुणा फूड्सच्या डेल्‍फ्रेज विक्री व मार्केटिंग विभागाचे महा-व्यवस्थापक कृष्णन रामनाथन या नवीन टप्प्याबद्दल म्हणाले, “शिजवण्यास सोप्या अशा चविष्ट व आरोग्यदायी अन्नपदार्थांना असलेली मागणी आणि ताजे अन्न खाण्याची संकल्पना हळूहळू वाढत आहे. आमच्या समृद्ध परंपरेमुळे आम्ही कायमच ग्राहकांची त्या त्या वेळेची गरज पूर्ण करणारी उत्पादने देण्यासाठी प्रयत्नशील असतो. आमची मांसाहारी पदार्थांची विस्तृत श्रेणी, ग्राहकांच्या उच्च दर्जाच्या अन्नपदार्थ पर्यायांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या तसेच ते पदार्थ शिजवण्याचा वेळ लक्षणीयरित्या कमी करण्याच्या दृष्टीने विकसित करण्यात आली आहे.”
ही दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ या वेळात सोमवार ते रविवार सुरू आहेत. आपल्या नजीकचे स्टोअर शोधण्यासाठी ग्राहक www.delfrez.com/storelocators वर लॉगऑन करू शकतात किंवा https://order.delfrez.com वर जाऊन ऑर्डर करू शकतात.

 16,801 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.