मुंबई शहरचे “पंच कबड्डी शिबीर” बोर्डी-पालघरला होणार.

   

कबड्डी स्पर्धा व सामने जास्तीत जास्त प्रमाणात निर्दोषपणे खेळविण्यात यावेत म्हणून कबड्डी पंचांची नियमावर उजळणी या शिबिरात घेण्यात येणार आहे.

मुंबई : मुंबई शहर कबड्डी संघटनेचे ” कबड्डी पंच शिबिर” १५ व १६ ऑक्टोबर या २ दिवसाकरिता पालघर जिल्ह्यातील बोर्डी येथे होणार आहे. सर्व पंचांच्या निर्णयात एकवाक्यता व सुसूत्रीपणा असावा. खेळ, खेळाडू, पंच, स्पर्धा भरविणाऱ्या संस्था आणि कबड्डीप्रेमी क्रीडारसिकांच्या दृष्टीने कबड्डी स्पर्धा व सामने जास्तीत जास्त प्रमाणात निर्दोषपणे खेळविण्यात यावेत म्हणून कबड्डी पंचांची नियमावर उजळणी घेण्यात येणार आहे. त्याच बरोबर त्यांच्या मनात असलेल्या शंकेचे समाधान देखील या शिबिरात करण्यात येणार आहे.
या शिबिराचे उदघाटन शनिवार १५ ऑक्टोबर रोजी सायं. ६-०० करण्यात येणार आहे. तरी सर्व सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहून व शिबीर शुल्क भरून या शिबिरास उपस्थित राहून संघटनेला सहकार्य करावे. असे एका पत्रकाद्वारे मुंबई शहर कबड्डी संघटनेने प्रसार माध्यमामार्फत पंच सदस्यांना कळविले आहे.

 168 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.