भारताचा यूएईवर १७ धावांनी विजय

इनडोअर क्रिकेट विश्वचषक

सिडनी : जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाने (WICF) ऑस्ट्रेलियात आयोजित केलेल्या इनडोर क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताने यूएईवर १७ धावांनी पराभव करून विजय मिळवला. आज झालेल्या सामन्यात भारताने फलंदाजी करताना १६ षटकात ११३ धावा केल्या तर यूएईने ९६ धावा करताना जोरदार लढत दिली.
१६ षटकांच्या सामन्यात भारताने चांगली सुरुवात करून दिली. भारताच्या चारही जोड्यांनी अनुक्रमे ३१, १७, ३६ व २९ धावा करत एकूण ११३ धावा करत मजबूत स्थिति मिळवली. तर भारतीय गोलंदाजांनी यूएईच्या चारही जोड्यांना अनुक्रमे २३, ३८, २१ व १४ धावांवर रोखल. आजच्या सामन्यात यूएईने भारताला जोरदार लढत दिली मात्र भारताने १७ धावांनी विजय साजरा केला. भारताच्या गोलंदाजांनी १६ षटकात यूएईचे एकूण ५ फलंदाजांना बाद केल्याने यूएईच्या धावाफलकतून २५ धावा कमी करता आल्या तर यूएईच्या गोलंदाजांनीही १६ षटकात भारताचे एकूण ५ फलंदाजांना बाद केल्याने भारताच्या धावाफलकतूनसुध्दा २५ धावा कमी करता आल्या. एकूणच भारताची फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण अतिशय उच्च दर्जाचे झाले त्यामुळेच कडव्या प्रतिकारनंतर सुध्दा भारताला विजय प्राप्त करता आला.
भारता तर्फे पहिल्या जोडीने दैविक राय (२३) व धनुश भास्कर (८) यांनी करून दिलेल्या चांगल्या सुरवतींनंतर दुसऱ्याच्या जोडीतील विजय हनुमंतरायाप्पा (१९) व अफ्रोज पाशा (-२), तिसऱ्या जोडीतील सुरज रेड्डी (१७) व अरिज अजीज (१९) व चौथ्या व शेवटच्या जोडीतील नमशीद व्हि. (१६) व मोहसिन नादाम्मल (१३) यांनी भारतासाठी जोरदार कामगिरीची नोंद केली.
यूएईच्या पहिल्या जोडीमधील आकीब मलीक (८) व एन. नासिर (१५), दुसऱ्या जोडीमधील विक्रांत शेट्टी (२३) व प्रेम व्यास (१५), तिसऱ्या जोडीतील जय जोशी (८), व दिल्लसारा सासंका (१३) तर शेवटच्या जोडीतील प्रशांथ कुमारा (१३) व ईसूरू उमेश (१) यांनी कडवी लढत दिली.
भारताच्या सूरज रेड्डीने २, मोहसिन नादाम्मल, विजय हनुमंतरायाप्पा व अफ्रोज पाशा यांनी प्रत्येकी एक एक फलंदाज बाद केला. तर यूएईच्या दिल्लसारा सासंकाने ३ व जय जोशीने २ फलंदाज बाद केले. या सामन्यात प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार यूएईच्या दिल्लसारा सासंकाला देऊन गौरवण्यात आले.

 156 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.