बेरोजगारी, गॅस दरवाढ, अन्नधान्याच्या वाढलेल्या किमती, महिलांवरील अत्याचार, जातीयवाद आदी समस्या देशभरात वाढीस लागल्या आहेत. याविरोधात नोव्हेंबर महिन्यात राज्यभर जनआंदोलन छेडणार
ठाणे : देशभर सध्या महागाईचा आगडोंब उसळला आहे. तसेच बेरोजगारी आणि इतर समस्यांनी देश मेटाकुटीस आला आहे. त्यानिषेधार्थ राज्यभर जनआंदोलन उभारण्याचा निर्णय रिपाइं एकतादीच्या राज्य कार्यकारीणीत देण्यात आला.
रिपाइं एकतावादीची प्रदेश कार्यकारिणीची बैठक नुकतीच दिक्षाभुमी नागपूर येथे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
देशाचा जीडीपी सध्या मोठ्या प्रमाणात खालावत आहे. रुपयाचे अवमुल्यन वाढले आहे. बेरोजगारी, गॅस दरवाढ, अन्नधान्याच्या वाढलेल्या किमती, महिलांवरील अत्याचार, जातीयवाद आदी समस्या देशभरात वाढीस लागल्या आहेत. याविरोधात नोव्हेंबर महिन्यात राज्यभर जनआंदोलन छेडण्याचा इशारा रिपाइं एकतावादीने दिला आहे. दरम्यान, नागपूर येथे झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने विकास निकम यांची फेरनिवड करण्यात आली. तर राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी संविधान दिनी डॉ. आंबेडकर भवन नवी दिल्ली येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
341 total views, 1 views today