श्रिया सोंडूर बुवा यांनी  शिंपले स्वरांचे चांदणे

स्वरमयी कोजागिरी
●चंद्राच्या शीतल चांदण्याला सुरांचा अभिषेक
●श्रिया सोंडूर बुवा यांची सुरेल मैफिल
●अर्थव कुलकर्णी, अनंत जोशी यांची प्रभावी साथ

ठाणे : ब्राह्मण सेवा संघातर्फे कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्त युवा शास्त्रीय, उपशास्त्रीय गायिका श्रिया सोंडूर बुवा यांच्या गायनाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. कोजागिरीच्या संध्याकाळ सुश्राव्य गायनाने सुरमयी झाली होती. गेली सतरा वर्ष गायन शिकणाऱ्या श्रिया सोंडूर बुवा यांनी राग नंद, शहाणा कानडा, नाट्यपद, झुला, अभंग आणि भैरवी यातून सुमारे दोन तास स्वरांचे चांदणे शिंपून कोजागिरीची रात्र प्रकाशमान केली. चंद्राच्या शीतल चांदण्याला सुरांचा अभिषेक केला. श्रिया सोंडूर बुवा यांना तबल्यावर अथर्व कुलकर्णी आणि संवादिनीवर अनंत जोशी यांनी प्रभावी साथ केली. संघाच्या तळमजल्यावरील सभागृहात सदर कार्यक्रम झाला. ब्राह्मण सेवा संघाच्या वतीने दरवर्षी कोजागिरीला गाण्याच्या मैफिलीचे श्रोत्यांसाठी विनामूल्य आयोजन केले जाते.  ब्राह्मण सेवा संघाचे विश्वस्त आनंद कुलकर्णी यांनी सर्व कलाकारांचे स्वागत केले. कार्याध्यक्ष दिलीप नामजोशी यांनी कलाकारांची ओळख करून दिली.

 48,882 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.