मुंबईच्या शिवशक्तीला महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे जेतेपद

विशेष व्यावसायिक गटात भारत पेट्रोलियम, तर प्रथम श्रेणी व्यावसायिक गटातसी.जी.एस.टी. संघांला विजेतेपद. शिवनेरी सेवा मंडळ विशेष व्यावसायिक, प्रथम श्रेणी व्यावसायिक जिल्हास्तरीय व स्थानिक महिला गट राज्यस्तरिय कबड्डी स्पर्धा- २०२२

मुंबई : शिवशक्ती महिला संघाने शिवनेरी सेवा मंडळ आयोजित “स्थानिक महिला गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे” विजेतेपद पटकाविले. शिवशक्तीची पूजा यादव स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली. तिला रोख रु.पाच हजार(₹५,०००/-) व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. दादर शिंदेवाडी येथील भवानीमाता क्रीडांगणावर झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात शिवशक्तीने डॉ. शिरोडकरचा कडवा प्रतिकार ४१-३६ असा मोडून काढत ” भागीरथीबाई सावंत स्मृती चषक” व रोख रु.पंचवीस हजार(₹२५,०००/-) आपल्या खात्यात जमा केले. उपविजेत्या शिरोडकरला “सुवर्णा परब स्मृतीचषक” व रोख रु. पंधरा हजार(₹१५,०००/-)वर समाधान मानावे लागले. शिरोडकरच्या मेघा कदमने पहिल्याच चढाईत गुण घेत संघाचे खाते खोलले. त्यानंतर सलग आणखी ३गुण घेत ४-० अशी आघाडी घेतली. शिवशक्तीने मेघांची अव्वल पकड करीत २गुणांनी आपले खाते उघडले. रिया मडकईकरने चढाईत २गुण टिपत बरोबरी साधली.शिवशक्तीने लोण देत १०-०४ अशी आघाडी घेतली. पण ती फार काळ टिकली नाही. शिरोडकरने त्यानंतर पूर्वार्धातच २लोण देत २२-१३ अशी आघाडी घेतली. 
  उत्तरार्धात शिवशक्तीची पूजा चढाई करताना स्वयंचित(सेल्फ आऊट) झाली.त्याच वेळी शिरोडकरच्या ३खेळाडू राखीव क्षेत्रात गेल्यामुळे बाद झाल्या. येथेच सामना त्यांच्या हातून निसटला. याचा फायदा घेत शिवशक्तीने लोणची परतफेड करीत आघाडी २२-२५ अशी कमी करत आणली. शिवशक्तीच्या पूजाने बोनस करीत व गुण घेत २९-२८ अशी आघाडी घेतली. शिरोडकरच्या मेघाने बोनससह २गडी टिपत संघाला पुन्हा आघाडीवर नेले. शेवटची ५मिनिटे असताना ३२-३० अशी शिरोडकरकडे आघाडी होती. शेवटची काही मिनिटे शिल्लक असताना शिवशक्तीने शिरोडकरवर आणखी एक लोण देत ३८-३२ अशी आघाडी घेतली. आणि सामनाही आपल्या नावे केला. तसे पाहिले तर हा सामना मेघा कदम विरुद्ध पूजा यादव असाच झाला. शिवशक्तीकडून पूजाला चढाईत रिया मडकईकरची, तर पकडीत साक्षी रहाटे व साधना विश्वकर्मा यांची उत्तम साथ लाभली. शिरोडकरकडून मेघाला चढाईत कशिश पाटील, तर पकडीत साक्षी सावंत, श्रावणी घाडीगांवकर यांची मोलाची साथ लाभली. या अगोदर झालेल्या उपांत्य सामन्यात शिवशक्तीने स्वराज्यला ३५-२१ असे, तर डॉ. शिरोडकरने होतकरूचा ४३-१९ असे पराभूत करीत अंतिम फेरी गाठली होती. उपांत्य उपविजयी दोन्ही संघाना प्रत्येकी रोख रु.पाच हजार(₹५,०००/-) व चषक बहाल करण्यात आला. शिरोडकरची मेघा कदम स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईची, तर शिवशक्तीची साक्षी रहाटे उत्कृष्ट पकडीची खेळाडू ठरल्या. दोघींना रोख रु. दोन हजार पाचशे(₹२,५००/-) व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. शिवशक्तीची रिया मडकईकर स्पर्धेतील लक्षवेधी खेळाडू ठरली. तिला रोख रु.एक हजार(₹१,०००/-) व सोन्याची नथ देऊन सन्मानित करण्यात आले.
विशेष व्यावसायिक गटात भारत पेट्रोलीयमने महिंद्राचा चुरशीच्या लढतीत ३१-२८असा पराभव करीत. “स्व. मोहन नाईक चषक व रोख रु. पंचवीस हजार(₹२५,०००/-)आपल्या नावे केले. उपविजेत्या महिंद्राला चषक व रोख रु.पंधरा हजार(₹१५,०००/-)वर समाधान मानावे लागले. भारत पेट्रोलीयमचा अक्षय सोनी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याला रोख रु.पाच हजार (₹५,०००/-) व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. महिंद्राने सुरूवात झोकात केली होती. पण अक्षय सोनीने आपल्या एकाच चढाईत ३गडी टिपत सामना भारत पेट्रोलीयमच्या बाजूने झुकविला. मध्यांतराला १६-१० अशी आघाडी पेट्रोलियम संघाकडे होती. उत्तरार्धात ही आघाडी टिकवीत संयमाने खेळ करीत सामना आपल्या नावे केला. उत्तरार्धात महिंद्राने खेळ गतिमान करीत कडवी लढत दिली. पण विजयापासून ते दूरच राहिले. अक्षय सोनी, रिशांक देवाडीगा यांच्या चतुरस्त्र चढाया त्याला शुभम दिडवाघ, निलेश शिंदे यांची मिळालेली पकडीची साथ यामुळे भारत पेट्रोलियमने हा विजय साकारला. अभिषेक भोजने, आकाश गायकवाड, शुभम शिर्के, स्वप्नील शिंदे यांचा चढाई-पकडीचा खेळ महिंद्राला विजयी करण्यास कमी पडला. महिंद्राचा अभिषेक भोजने व भारत पेट्रोलियमचा शुभम दिडवाघ स्पर्धेतील अनुक्रमे उत्कृष्ट चढाई व पकडीचे खेळाडू ठरले. दोघांना प्रत्येकी रोख रु. दोन हजार पाचशे(₹२,५००/-) व भेटवस्तू प्रदान करण्यात आली. युनियन बँकेचा भरत कलगुटकर  स्पर्धेतील लक्षवेधी खेळाडू ठरला. त्याला रोख रु. एक हजार(₹१,०००/-) व भेटवस्तू देण्यात आली. 
प्रथम श्रेणी व्यावसायिक गटात सी.जी.एस.टी.ने श्री स्वामी समर्थचा प्रतिकार ४३-२५ असा सहज मोडून काढत रोख रु.पंधरा हजार(₹१५,०००/-) व “स्व. मुकुंद अण्णा जाधव चषकाला” गवसणी घातली. सी.जी.एस.टी.चा सूरज धुंदले स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याला रोख रु.पाच हजार(₹५,०००/-) व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. भागेश भिसेने पहिल्याच चढाईत गुण घेत सी.जी.एस.टी.चे खाते खोलले. ९व्या मिनिटाला लोण देत १३-०५ अशी सी.जी.एस.टी.ने आघाडी घेतली. पुन्हा सूरज धुंदलेने एकाच चढाईत ५ गडी टिपत दुसरा लोण देत ती २३-१०अशी वाढविली. मध्यांतराला २३-१२अशी त्यांच्याकडे आघाडी होती. उत्तरार्धात जोरकस खेळाची पुनरावृत्ती करीत १८गुणांच्या फरकाने विजय साकारला. भागेश भिसे, सूरज धुंदले यांच्या झंजावाती चढायांना आणि मयूर शिवतरकर, अक्षय सूर्यवंशी यांच्या भक्कम पकडीला सी.जी.एस.टी.च्या विजयाचे श्रेय जाते. गौरव पाटील, विजय पवार श्री स्वामी समर्थकडून बऱ्यापैकी खेळले. 

 254 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.