ठाणे शहरात प्रभागनिहाय बहुजन एकीकरण परिषदांचे आयोजन

ओबीसी, एससी, एसटी, एनटी या समाजामध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने या परिषदांचे आयोजन करण्याचा घेण्यात आला निर्णय

ठाणे : ठाणे ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने ठाणे शहरात बहुजन समाज जोडो अभियानाला सुरुवात करण्यात येणार आहे. येत्या १५ ऑक्टोबरपासून ठाणे मनपाच्या हद्दीत प्रभाग निहाय बहुजन एकीकरण परिषदांचे आयोजन करण्यात येणार आहे.
शनिवारी शासकीय विश्रामगृहात ठाणे ओबीसी एकीकरण समितीने सर्व समविचारी संघटना, व्यक्ती यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये ओबीसी, एससी, एसटी, एनटी या समाजामध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने या परिषदांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बहुजनांना आपली राजकीय, सामाजिक ताकद समजावून सांगण्यासाठी या परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक प्रभागामध्ये विचारवंत आणि सामाजिक-राजकीय अभ्यासकांना बोलावून त्यांचे मार्गदर्शन ठेवण्यात येणार आहे. त्याची सुरुवात विटाव्यातून होणार आहे. तसेच, सावित्रीमाई फुले यांच्या जयंती दिनी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये या अभियानाचा समारोप करण्यात येणार असून त्या सभेस राज्यातील ओबीसी नेत्यांना बोलाविण्यात येणार आहे, असे यावेळी जाहीर करण्यात आले.
या बैठकीस ओबीसी एकीकरण समितीचे निमंत्रक प्रफुल वाघोले, राज राजापूरकर, सचिन शिंदे, सुभाष देवरे, मंगेश आवळे, गजानन चौधरी, अमीत पाटील, मिलिंद बनकर, सचिन केदारी, रविंद्र कोळी, राजाभाऊ चव्हाण, संदीप बेलवले, निलेश हातणकर, अजय जाधव, मेघनाथ घरत, धर्मेद्र वाघुले, बळीराम खरे, अशोक विशे, किसन बोंद्रे, जगदीश खैरालिया, संजय भालेराव, नवनीत शिनलकर, कृपाल कांबळे, अरूण पाटील, राजेश विराळे, किरण पाटील, अमित पाटील, जितेंद्र मढवी, देवराज राठोड, शिवप्रसाद यादव, राजू शिरोडकर, शंभू जळकोटे, प्रशांत हडकर, प्रल्हाद मल्लाह, मिलिंद सोनावणे, शेखर पाटील, रामधार साहणी, यतिन पवार, अरविंद सैजवडेकर, नथू पाटील, संजय पाल, पप्पू मोमीन, जितेंद्र यादव आदी उपस्थित होते.

 48,197 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.