‘हरिओम’ मधील गाणे प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबई : ‘हरिओम’ चित्रपटातील आपल्याला एकापेक्षा एक वेगवेगळ्या धाटणीची गाणी पाहायला मिळत आहेत. ‘सुरु झाले पर्व नवे’ हे प्रेमगीत, ‘उठ गड्या’ हे स्फूर्तीदायी गाणे , ‘डीजे वाल्या’ हे प्रत्येकास थिरकवणारे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर आता उडत्या पट्टीचे गाणे ‘तुला इष्काचा डसलाय मुंगळा’ प्रदर्शित झाले आहे. या झक्कास आयटम सॉंगला शाल्मली खोलगडे, निरंजन पाडगावकर यांचा जबरदस्त आवाज लाभला असून प्रशांत जामदार यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला निरंजन पाडगावकर यांनी संगीतबद्ध केले आहे. मराठीतच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी शाल्मली खोलगडे तिच्या उडत्या चालीच्या गाण्यांसाठी नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आली आहे. बोल्ड, ग्लॅमरस असे या गाण्याचे छायांकन प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत असल्याचे एकंदर चित्र दिसत आहे. आपल्या पहिल्याच चित्रपटातून हरिओम घाडगे यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. प्रत्येक वृत्तपत्रात असो किंवा सोशल मीडियावर असो ‘हरिओम’ची चलती आहे. चित्रपटाच्या टिझर, ट्रेलर आणि गाण्यांनी प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढवली आहे.
श्री हरी स्टुडिओज प्रस्तुत हरिओम घाडगे निर्मित, आशिष नेवाळकर आणि मनोज येरुणकर दिग्दर्शित ‘हरिओम’ या चित्रपटात हरिओम घाडगे, गौरव कदम, सलोनी सातपुते आणि तनुजा शिंदे हे प्रमुख भूमिकेत असून ‘हरिओम’चे क्रिएटिव्ह डायरेक्टर राज सुरवाडे आहेत. येत्या १४ ऑक्टोबरला ‘हरिओम’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
37,552 total views, 1 views today