शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने जाहीर मेळावा
ठाणे : शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने शिवसेना महाप्रबोधन यात्रेचा जाहीर मेळावा ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे रविवार ९ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे
या शिवसेना महाप्रबोधन यात्रेची सुरुवात ठाण्यापासून होत आहे शिवसेनेचे ठाणे ठाण्याची शिवसेना अतुट नात्याला गद्दारीचा शिक्का लागला असून स्वतःच्या राजकीय हवासापोटी शिवसेनेची गद्दारी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी शिवसेनेची तोफ ठाण्यात येणार आहे .
या जाहीर मेळाव्यासाठी शिवसेना नेते भास्कर जाधव , शिवसेना सचिव विनायक राऊत शिवसेना उपनेते सुषमाताई अंधारे यांचा प्रमुख मार्गदर्शन शिवसैनिकांना मिळणार आहे तसेच सदर मेळावा हा शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठीच नाही तर सर्व सामान्य नागरिकांसाठीही असणार आहे तरी या मेळाव्यासाठी जास्त संख्येने उपस्थित राहावे असे शिवसेने ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने सांगण्यात आलेले आहे.
2,754 total views, 1 views today