सामाजिक उपक्रमांद्वारे युनियन बँक मुंबई-ठाणे क्षेत्रीय कार्यालयातर्फे महात्मा गांधीना मानवंदना

वृक्षारोपण, विवीध योजनांचे लाभार्थी, व्यवसाय प्रतिनिधींना केले सन्मानित

ठाणे : युनियन बँक ऑफ इंडियाच्या मुंबई -ठाणे क्षेत्रीय कार्यालयातर्फे २ ऑक्टोबर रोजी १५३ व्या महात्मा गांधी जयंती निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
युनियन बँक ऑफ इंडियाचे संचालक निधू सक्सेना यांनी वर्तकनगर येथील नवीन शाखेचे ग्राहक, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन केले. जगदाळे इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक राहुल जगदाळे, बँकेचे महाव्यवस्थापक संजय नारायण, मुंबई-ठाणे क्षेत्रीय प्रमुख रेणू नायर आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी वर्तकनगर नवीन शाखा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
तसेच पीएम स्वनिधी, मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अटल पेन्शन योजना, बेसीक सेव्हींग बँक डिपॉझिट अकाऊंट यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल व्यवसाय प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. तसेच बँकेच्या ठाणे क्षेत्रीय कार्यालयाने २५,००० कोटी रुपयांचा व्यवसाय क्षेत्राचा आकडा ओलांडल्याबद्दल केक कापून आनंद साजरा करण्यात आला.
स्वामी विवेकानंद बालकाश्रम, येऊर हिल्स, ठाणे येथे बँकेच्या सीएसआर उपक्रमांतर्गत अनाथाश्रमातील मुलांसाठी शौचालय बांधण्यात आले आहे त्याचे लोकार्पण करण्यात आले. मॅट, बेड, हुडीज, ब्लँकेट आणि मेडिकल किटचेही वाटप केले. तसेच मुलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरही आयोजित केले गेले.
यावेळी बंगया परिषदतर्फे आयोजित कार्यक्रमात बँक स्टॉल `कॉर्पोरेट प्रदर्शन’चे उद्घाटन निधू सक्सेना यांच्या हस्ते करण्यात आले. शाखाप्रमुख आणि मार्केटिंग ऑफिसर यांच्या सहकार्याने या स्टॉलमध्ये कॉईन मेळा आणि रिटेल एक्स्पोचे आयोजन केले, अशी माहिती मुंबई-ठाणे क्षेत्रीय प्रमुख रेणू नायर यांनी दिली.

 1,348 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.