पुण्यातील प्रॉपर्टीच्या किंमतींत वार्षिक ८ टक्क्यांची वाढ

मागील वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर कालावधीमध्ये विक्री करण्यात आलेल्या ५५,९१० सदनिकांच्या तुलनेत जुलै ते सप्टेंबर २०२२ दरम्यान वार्षिक ४९ टक्क्यांची वाढ होऊन ८३,२२० सदनिकांच्या विक्रीची नोंद

पुणे : सणासुदीचा काळ उत्साहात सुरू असताना भारतातील रिअल इस्टेट विकासकांना या क्षेत्रामधील रिकव्हरीला चालना मिळण्याची आशा आहे आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होत आहेत. २०२१ च्या तिस-या तिमाहीच्या (जुलै ते सप्टेंबर) तुलेनत नवीन पुरवठ्याने वार्षिक ६१ टक्क्यांची वाढ केली. जुलै-सप्टेंबर २०२२ तिमाहीदरम्यान पुण्यातील प्रॉपर्टीच्या किंमतींमध्ये जवळपास वार्षिक ८ टक्क्यांची वाढ दिसण्यात आली, ज्यानंतर फक्त बेंगळुरूमध्ये जवळपास वार्षिक ९ टक्क्यांच्या वाढीची नोंद झाली.
आरईए इंडिया मालकीचे ऑनलाइन रिअल इस्टेट व्यासपीठ प्रोपटायगर डॉटकॉमने जारी केलेला निवासी बाजारपेठ ट्रेण्ड्सवरील त्रैमासिक अहवाल रिअल इनसाइट रेसिडेन्शियल- जुलै- सप्टेंबर २०२२ नुसार प्रबळ मागणी पाहता निवासी विक्रीने प्रबळ वाढ सुरू ठेवली आहे, जेथे मागील वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर कालावधीमध्ये विक्री करण्यात आलेल्या ५५,९१० सदनिकांच्या तुलनेत जुलै ते सप्टेंबर २०२२ दरम्यान वार्षिक ४९ टक्क्यांची वाढ होऊन ८३,२२० सदनिकांच्या विक्रीची नोंद करण्यात आली आहे.
‘’रिअल इस्टेट उद्योग महामारी आणि त्यानंतर झालेल्या परिणामांमधून पुन्‍हा सावरत आहे आणि हे आमच्या अहवालातील डेटा ट्रेंड व माहितीमधून स्पष्टपणे दिसून येते. विशेषत: नुकतेच सुरू झालेल्या सणासुदीच्या काळात मालमत्ता गुंतवणूकीबद्दल ग्राहकांच्या सकारात्मक भावनांमध्ये सतत वाढ होत असल्याचे आमच्या निदर्शनास येत आहे. यावर्षी तिस-या तिमाहीत घरांच्या मागणीत लक्षणीय सुधारणा झाली आहे आणि यामुळे पुढच्या तिमाहीसाठी देखील उत्तम मागणी दिसून येईल,’’ असे विकास वाधवान हाऊसिंग डॉटकॉम, प्रोपटायगर डॉटकॉम आणि मकान डॉटकॉमचे ग्रुप सीएफओ म्हणाले.
वाधवान पुढे म्हणाले, ‘’एकूण व्याजदरांमध्ये काहीशी वाढ झाली असली तरी घरांसाठी मागणी कमी झालेली नाही, ज्याचे श्रेय घराचे मालकीहक्क मिळवण्याप्रती नवीन विश्‍वसाला जाते. खरेतर आम्ही आमच्या अहवालामधून अनुमान काढला आहे की, निवासी मालमत्तांसाठी मागणीने २०१९ मधील तिस-या तिमाहीमधील (जुलै ते सप्टेंबर) महामारीपूर्वीच्या पातळ्यांना मागे टाकले आहे. सणासुदीच्या भावना आणि ऑफर केलेल्या विविध सवलतींमुळे विकासकांना खात्री आहे की, मालमत्ता खरेदी करण्यात ग्राहकांची आवड आणखी वाढेल.”
मुंबई आणि पुणे पुन्हा अव्वल स्थानावर:
२०२२ च्या तिस-या तिमाहीत (जुलै ते सप्टेंबर) एकूण विक्रीच्या ५३ टक्के हिस्स्यासह मुंबई आणि पुणे चार्टमध्ये अव्वल स्थानावर आहेत. बहुतेक विकल्या गेलेल्या मालमत्तांच्या (२७ टक्के) किंमती ४५ लाख ते ७५ लाख रूपयांपर्यंत कमी झाल्या.
रेडी-टू-मूव्ह-इन सदनिकांची कमी झालेल्या यादीमुळे विक्री करण्यात आलेल्या जवळपास १९ टक्के सदनिका आरटीएमआय प्रॉपर्टीज होत्या, तर उर्वरित ८१ टक्के सदनिकांचे बांधकाम सुरू होते किंवा नवीन लॉन्च होते. आमचा नवीन कंझ्युमर सेंटिमेंट आऊटलुक (जुलै-डिसेंबर २०२२) नुसार ५८ टक्के संभाव्‍य गृहखरेदीदार आरटीएमआय प्रॉपर्टींचा शोध घेत आहेत.

 210 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.