कोव्हिड-१९ मुळे श्वसनाच्या समस्यांमध्ये अधिकच भर

निरोगी फुफ्फुसांवरही गंभीर परिणाम होत असल्याचे सर्वेक्षणात निष्पन्न

मुंबई : कोव्हिड-१९ पॅनडेमिक आता बहुधा मागे पडले आहे आणि अखेर जगभरातील लोकांचे जगणे पुन्हा पूर्वीसारखे होऊ लागले आहे. मात्र या आजाराच्या उद्रेकानंतर श्वसनसंस्थेशी व त्यातही प्रामुख्याने फुफ्फुसांशी निगडित काही गंभीर समस्या आपल्या समोर येत आहेत.
पॅनडेमिक थंडावले असले तरीही फुफ्फुसांच्या ढासळत्या आरोग्याच्या नव्याने उदयास येणा-या समस्येमध्ये त्याचा परिणाम स्पष्टपणे प्रतिबिंबित होत आहे, असे अमेरिकन थोरॅसिस सोसायटीने अलीकडेच केलेल्या एका पाहणीतून निदर्शनास आले आहे. कोव्हिड-१९ मुळे न्यूमोनियासारखे फुफ्फुसांचे आजार आणि गंभीर परिस्थितीमध्ये उद्भवणा-या अक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम किंवा एआरडीएसची लागण होऊ शकते.
जागतिक फुफ्फुस दिनी या विषयावर आपले मत नोंदविताना पद्मश्री किताबाचे मानकरी आणि डॉ. बत्राज ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक आणि चेअरमन डॉ. मुकेश बत्रा म्हणाले, “आपले फुफ्फुस हे जुनाट आजारांची लागण होण्याबाबत खूपच संवेदनशील असते. मग तो अस्थमा असो, सीओपीडी असो किंवा ब्रॉन्कायटिस. कोव्हिड-१९ पॅनडेमिकने श्वसनाच्या समस्यांमध्ये अधिकच भर घातली आहे. ५० वर्षांपासून होमेओपॅथी प्रॅक्टिशनर म्हणून काम करणारी एक व्यक्ती म्हणून मला असे वाटते की, ही औषधोपचार पद्धती व्यक्तिगत उपचारांच्या माध्यमातून आजाराचे मूळ कारण शोधून काढत बहुतांश प्रकारच्या श्वसनरोगांवर परिणामकारक उपचार करू शकते. होमियोपॅथीचा स्वीकार करण्याबरोबरच लोकांनी निरोगी आयुष्य जीवनशैली अनुसरली पाहिजे (जसे की, श्वसनाचे व्यायाम करणे) आणि फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी धूम्रपान आवर्जून टाळले पाहिजे.”
जगभरातील लक्षावधी लोक श्वसनसंस्थेला होणा-या जंतूसंसर्गातून बरे होण्यासाठी धडपडत आहेत, मात्र अल्प ते मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्ये (LMIC) जिथे संशोधन, प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसतो अशा ठिकाणी या आजारांचे प्रमाण प्रचंड जास्त असल्याचे दिसून येत आहे. या असमानतेवर मात करण्यासाठी तंबाखूसेवन, वायूप्रदूषण, गरीबी आणि पर्यावरण बदल यांसारख्या सामाजिक व पर्यावरणीय घटकांकडेही लक्ष दिले गेले पाहिजे.
कोव्हिड-१९ मधून ब-या झालेल्या किंवा लाँग कोव्हिड असलेल्या बालकांमध्ये आणि किशोरवयीन मुलांच्या एमआरआयमध्ये फुफ्फुसांना झालेले सातत्यपूर्ण नुकसान दिसून येत असल्याचे रेडिओलॉजिकल सोसायटी ऑफ नॉर्थ अमेरिकाद्वारे प्रकाशित रेडिओलॉजीमध्ये प्रसिद्ध आणखी एका पाहणीच्या निष्कर्षांतून दिसून आले आहे. ५४ बालके आणि किशोरवयीन मुलांच्या (सरासरी वय ११ वर्षे) फुफ्फुसांच्या रचनेत आणि कार्यामध्ये बदल झाल्याचे संशोधकांना आढळून आले आहे. या पाहणीत सहभागी झालेल्या ५४ रुग्णांपैकी २९ रुग्ण हे कोव्हिडमधून बरे झालेले होते तर २५ रुग्णांना लॉँग कोव्हिड होता. यातील एक व्यक्ती सोडून इतर सर्व व्यक्तींचे मूळ संसर्गाच्या वेळी लसीकरण झालेले नव्हते.
आणखी एक बाब म्हणजे कोव्हिड-१९ मुळे होणारा न्यूमोनिया दोन्ही फुफ्फुसांवर कब्जा करतो आणि त्यामुळे ऑक्सिजन घेण्याची क्रिया दुष्कर बनते. असे झाल्याने धाप लागते, सतत खोकला येतो व इतर लक्षणे जाणवतात. कोव्हिडमुळे प्रभावित फुफ्फुसे बरी होणे हे त्यांना कोणत्या प्रकारची सेवा पुरविली जात आहे तसेच स्वत: कोव्हिडची तीव्रता किती होती यावर अवलंबून असते.

 163 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.