पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त विशेष व्याख्यान

ठाणे, दि. २० सप्टेंबर : एकात्ममानव दर्शनाचे भाष्यकार, अंत्योदयाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकशे सहाव्या जयंती निमित्त दीनदयाळ प्रेरणा केंद्राने पंडित दीनदयाळ उपाध्याय आजच्या संदर्भात या विषयवार व्याख्यान योजले आहे. सदर व्याख्यान रविवार, दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता प्रताप व्यायाम शाळा नौपाडा, ठाणे येथे होईल. प्रज्ञा प्रवाह या वैचारिक उपक्रमाचे सदस्य, खगोलशास्त्र आणि गणितीय वित्त विषयाचे जाणकार, राष्ट्रीयता आणि वसाहतवादाचे अभ्यासक डॉ. हर्षल भडकमकर हे या व्याख्यानाचे वक्ते आहेत. या प्रबोधनपर माहितीपूर्ण व्याख्यानाला नागरिकांनी यावे असे आवाहन दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे अध्यक्ष भा. वा. दाते आणि कार्यवाह मकरंद मुळे यांनी केले आहे.

 24,616 total views,  3 views today

Leave a Reply

Your email address will not be published.