ठाणे दैवज्ञ ब्राह्मण समाजाचा गुणगौरव सोहळा संपन्न

ठाणे, प्रतिनिधी
मराठी ग्रंथ संग्रहालयात ठाण्याच्या दैवज्ञ ब्राह्मण समाजाचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ काल संपन्न झाला. यावेळी भारतीय रेल्वेचे जनक आधुनिक मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेठ यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालयात पार पडलेल्या या सोहळ्याच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन आणि श्री गणेश व सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष दिनकर बायकेरीकर, वस्तू व सेवा कर विभागाच्या सहाय्यक आयुक्त मनीषा आडवणकर यावेळी उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाला ठाण्यातील ज्ञाती बांधव आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला दैसपचे उपाध्यक्ष रविंद्र माहिमकर, सुर्यकांत कल्याणकर, सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर, खजिनदार मालंडकर, कार्याध्यक्ष विजय पितळे,युवाप्रमुख महेश धामणस्कर, युवा समिती सभासद समीर हळदणकर,नंदु वळीवडेकर, रंजना सिरसागर आणि सतीश महाजन आदी पदाधिकारी यावेळी आवर्जून उपस्थित होते. दैवज्ञ ब्राह्मण समाज ठाणे संस्थेचे अध्यक्ष उल्हास दांडेकर हे परदेशात असल्यामुळे महिला समितीच्या प्रमुख करुणा आर्यमाने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तसेच संस्थेच्या विश्वस्त साधना अमृते या व्यासपीठावर उपस्थित होत्या. संस्थेचे चिटणीस अजित गोरे यांनी सूत्रसंचालन केले. तर महिला समितीच्या उपाध्यक्ष स्वप्नाली कल्याणकर यांनी आभार प्रदर्शन केले. सदर कार्यक्रमांमध्ये इयत्ता पहिली ते बारावी तसेच, डिप्लोमा, डिग्री, इंजिनिअरिंग आणि मेडिकल आदी 25 विद्यार्थ्यांचा सत्कार अखिल भारतीय दैवज्ञ समाज अध्यक्ष दिनकर बायकेरीकर, वस्तू व सेवा कर विभागाच्या सहाय्यक आयुक्त मनीषा आडवणकर तसेच संस्थेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या करुणा आर्यमाने यांच्याहस्ते करण्यात आला.त्याचबरोबर ठाण्यातील दैवज्ञ भवन उभारण्याचे काम करणारे समाजाचे ज्ञाती बांधव बांधकाम व्यावसायिक नितिन मिरवणकर आणि वधू-वर समितीच्या अध्यक्षा सौ. पल्लवी श्रीमणी व त्यांच्या समितीच्या सर्व सदस्यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. समाजाचे खजिनदार अजित अमृते, उपखजिनदार गजानन मानकामे, दैसप सुनील भुर्के, सुनील देवरुखकर, परेश पोतदार – कळवा अध्यक्ष, जुतिका कोटकर, जयश्री माणकेकर,आरती मालडिकर, कार्यकारणी सदस्य आणि समाजाचे ज्ञाती बांधव उपस्थित होते. याप्रसंगी माधुरी खेडेकर यांनी ईशस्तवन केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मनीषा आडवणकर यांनी 11001 रुपयांची देणगी समाजाला दिली. तर समाजाच्या सायली संजय गोरे यांनीही 5000 रुपयांची देणगी जाहीर केली.चहा पान झाल्यावर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली

 12,296 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.