ठाणे जिल्ह्यात रविवारी, १८ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम

ठाणे, दि. १६ (जिमाका) : उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवारी दि. १८ सप्टेंबर २२ रोजी जिल्ह्यातील पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ लसीचा डोस देण्यात येणार आहे. पालकांनी आपल्या बालकांना लस द्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

ठाणे जिल्ह्यात उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम ग्रामीण भागातील अंबरनाथ, कल्याण, भिवंडी व मुरबाड तालुक्यात तसेच बदलापूर अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात राबवण्यात येणार असून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील चार तालुक्यातील 5 वर्षा पर्यंतच्या एकूण 106415 बालकांना तर बदलापूर, अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील एकुण 68296 बालकांना पोलिओची लस देण्यात येणार आहे. या मोहिमेत ग्रामीण व बदलापूर, अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात एकूण 1392 बुथवर लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी 3 हजार 408 कर्मचाऱ्यांचा सहभाग असणार आहे.

दि. १८ सप्टेंबर रोजी बुथवर लसीकरण केल्यानंतर राहिलेल्या बालकांसाठी पुढील 3 ते 5 दिवसात
आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन पोलिओचे लसीकरण करणार आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.

जिल्हाधिकारी श्री. राजेश नार्वेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यात “उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम” राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.पुष्पा गणेश पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष गोटिराम पवार तसेच सभापती आरोग्य व बांधकाम वंदना किसन भांडे यांनी सदर मोहिमेत सर्व पालकांनी आपल्या बालकांना पोलिओ लस घेण्याकरीता आवाहन केले आहे.

 12,034 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.