ठाणे – ठाणे जिल्ह्यात गुरुवारी २८३ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ५ लाख ४६ हजार १०८ रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात १३ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या ११ हजार ७९ झाली आहे.
ठाणे शहर परिसरात ५९ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख ३६ हजार ०२६ झाली आहे. शहरात १ मृत्यूंची नोंद आहे. तर कल्याण – डोंबिवलीत ८२ रुग्णांची वाढ झाली असून ३ मृत्यूची नोंद आहे. नवी मुंबईत ५९ रुग्णांची वाढ झाली असून ३ मृत्यूची नोंद आहे. उल्हासनगरमध्ये ६ रुग्ण सापडले असून २ मृत्यूची नोंद आहे. भिवंडीत ० बाधीत असून मृत्यूची नोंद नाही. मीरा भाईंदरमध्ये १९ रुग्ण आढळले असून १ मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये ६ रुग्ण आढळले असून १ मृत्यूची नोंद आहे. बदलापूरमध्ये २८ रुग्णांची नोंद असून १ मृत्यूची नोंद आहे. ठाणे ग्रामीणमध्ये २४ नवे रुग्ण वाढले असून १ मृत्यूची नोंद आहे. आता बाधीत रुग्णसंख्या ४० हजार ५९३ झाली आहे. आतापर्यंत १२०९ मृत्यूंची नोंद आहे.
919 total views, 1 views today