ठाणे – ठाणे जिल्ह्यात मंगळवारी २७० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ५ लाख ४५ हजार ५४९ रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात ९ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या ११ हजार ५६ झाली आहे.
ठाणे शहर परिसरात ६२ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख ३५ हजार ९०८ झाली आहे. शहरात मृत्यूंची नोंद नाही. तर कल्याण – डोंबिवलीत ७३ रुग्णांची वाढ झाली असून ३ मृत्यूची नोंद आहे.
नवी मुंबईत ५१ रुग्णांची वाढ झाली असून १ मृत्यूची नोंद आहे. उल्हासनगरमध्ये ११ रुग्ण सापडले असून ३ मृत्यूची नोंद आहे. भिवंडीत २ बाधीत असून मृत्यूची नोंद नाही. मीरा भाईंदरमध्ये २० रुग्ण आढळले असून १ मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये ४ रुग्ण आढळले असून १ मृत्यूची नोंद आहे. बदलापूरमध्ये १८ रुग्णांची नोंद असून मृत्यूची नोंद नाही. ठाणे ग्रामीणमध्ये २९ नवे रुग्ण वाढले असून मृत्यूची नोंद नाही. आता बाधीत रुग्णसंख्या ४० हजार ५४९ झाली आहे. आतापर्यंत १२०८ मृत्यूंची नोंद आहे.
750 total views, 1 views today