दिवा आगासन रोड फेरीवाला मुक्त कधी होणार – रोहिदास मुंडे

दिवा आगासन रोड वाहनांसाठी कधी खुला होणार  रोहिदास मुंडे यांचा  पालिका आयुक्ताना संतप्त  सवाल 

फेरीवाल्यांना हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करा,मुंडेंचा आयुक्तांना मेल 

दिवा – कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणारा दिवा आगासन हा रस्ता वाहतुकीसाठी आहे की फेरीवाल्यांना आंदण देण्यासाठी असा संतप्त सवाल करत भाजपचे रोहिदास मुंडे यांनी फेरीवाले हटवून हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा अशी मागणी  ईमेलद्वारे आयुक्तांना पाठवली आहे.

आयुक्तांना दिलेल्या ईमेल मध्ये रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे की,ठाणे महापालिका मार्फत बनविण्यात येत असलेल्या या रस्त्या बाबत आपले आभार आहे. मात्र हा रस्ता वाहतुकीसाठी बनविण्यात आला आहे की फेरीवालांचे साम्राज्य उभारण्यासाठी केला आहे याचा खुलासा आपण करावा अशी उपहासात्मक विनंती मुंडे यांनी केली आहे.

दिव्यात सत्ताधाऱ्यांची मनमानी सुरू आहे.दिवा टनिंग ते ग्लोबल स्कुल या दरम्यान या दोन्ही लेन पूर्ण झाल्या आहेत.दिव्यात वाहतूक कोंडी याच रस्त्यावर होते म्हणून रुंदीकरण करण्यात आले,राहत्या इमारती तोडण्यात आल्या.मग असे असताना मोकळ्या रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्या ऐवजी त्यावर हातगाड्या लावण्याची परवानगी नेमकी कोण देत आहे याची आपण चौकशी करावी. 
तातडीने दिवा शहरातील प्रमुख रस्त्यावरील हातगाड्या हटविण्यात याव्यात.जर दिव्यातील मुख्य रस्त्यावरील हातगाड्या वर कारवाई झाली नाही तर याविरोधात आंदोलन केले जाईल याची असा  इशारा देखील मुंडे यांनी दिला आहे.

 351 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *