नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली साक्षीची दखल

नगरविकास मंत्री  एकनाथजी शिंदे यांची संवेदनशीलता

पूरग्रस्त केवनाळे ता.पोलादपूर दुर्घटनेतील साक्षी दाभेकर आणि प्रतिक्षा दाभेकर या दोन्ही जुळ्या बहिणींच्या शैक्षणिक पालकत्वची उचलली जबाबदारी

२ महिन्यांच्या बाळाला वाचविणाऱ्या साक्षीच्या अतुलनीय धाडसाचे ना.शिंदे साहेब यांचेकडून कौतुक

ठाणे – पूरस्थितीत पोलादपूर तालुक्यातील केवनाळे गावात एका दोन महिन्याच्या मुलाला वाचवताना भिंत अंगावर कोसळून साक्षी दाभेकर (वय १४) ही क्रीडापटू जबर जखमी झाली होती.  तिला तातडीने मुंबईत हलवण्यात आले असून ‘केईएम’मध्ये डाव्या पायावर शस्त्रक्रिया करून पाय गुडघ्यापासून खाली कापावा लागला आहे. या मुलीची घरची आर्थिक स्थिती अत्यंत बेताची असल्याने पुढील उपचाराच्या लाखो रुपयांच्या खर्चाचे प्रश्नचिन्ह उभे राहिला होता.  डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून साक्षीच्या रुग्णालयातील उपचारासाठी  सर्वोतोपरी आर्थिक मदत तसेच दोन्ही बहिणींचा पुढील शिक्षणाचा सर्व खर्चाची जबाबदारी घेण्यात येणार आहे. 

हि मुलगी धावपटु आहे, कब्बडी आणि खो खो तालुकास्तरावर खेळते. पण आता तिला पाय गमवावा लागलाय. कृत्रिम पाय बसवण्यासाठी मदतीचं आवाहन केलं जातं होत.

ABP माझा वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी यासंदर्भातील सविस्तर वृत्त दिले होते. याची दखल घेत नगरविकास मंत्री  एकनाथ शिंदे यांनी साक्षीला मदत करण्याचा निर्णय घेतला.

 442 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.