रविवारी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

मध्य रेल्वे रविवार दि. १.८.२०२१  रोजी आपल्या उपनगरी भागांत मेगाब्लॉक परिचालीत करणारआहे.  

 सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत ठाणे-कल्याण दरम्यान अप व डाउन जलद मार्गावर

मुंबई  – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.३७ ते दुपारी २.४८ या वेळेत सुटणारी डाउन जलद/अर्ध जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवली जाईल व त्यांच्या नियोजित वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचेल.

अप जलद/अर्धजलद मार्गावर  कल्याण येथून सकाळी १०.२६ ते दुपारी ३.१९  दरम्यान सुटणारी सेवा कल्याण व ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील व नियोजित वेळापत्रकांपेक्षा  १० मिनिटे उशीराने गंतव्य स्थानकावर पोहोचेल.

पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर लाईन सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत
 (बेलापूर-खारकोपर बीएसयू मार्ग वगळता) अप हार्बर मार्गावर पनवेल येथून सकाळी १०.४९ ते सायंकाळी ४.०१ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या  सेवा आणि
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ या वेळेत पनवेल/बेलापूरसाठी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

अप ट्रान्सहार्बर मार्गावर पनवेल येथून सकाळी ९.०१ ते दुपारी ३.५३ या वेळेत ठाण्याच्या दिशेने सुटणाऱ्या सेवा आणि
डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० या वेळेत पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या  सेवा बंद राहतील.

डाउन बीएसयू मार्गावर नेरुळ येथून सकाळी १०.१५ ते दुपारी २.४५ या वेळेत खारकोपरला जाणारी सेवा आणि
अप बीएसयू मार्गावर खारकोपर येथून सकाळी १०.४५ ते दुपारी ३.१५ या वेळेत नेरुळला जाणाऱ्या सेवा रद्द राहतील.

 सेवा उपलब्ध

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी विभागात विशेष उपनगरी गाड्या चालविण्यात येतील.

ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावर सेवा उपलब्ध असतील.

ब्लॉक कालावधीत बेलापूर-खारकोपर सेवा वेळापत्रकानुसार चालतील.

पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हे देखरेख मेगा ब्लॉक आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे. 

 347 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.