करोना काळातील सेवाकार्यामुळे समाजातील नकारात्मक चित्र बदलले – राज्यपाल

मुंबई – करोना संसागाच्या सव्वा वर्षाच्या काळात शासकीय अधिकारी, कर्मचारी, अशासकीय संस्था व एकूणच समाजातील सर्व लोकांनी कर्तव्यापलीकडे जाऊन सेवाकार्य केल्यामुळे समाजातील नकारात्मक चित्र बदलले. समाजातील अधिकांश लोक चांगले काम करण्यास उत्सुक असतात. परंतु त्यांना काम करण्याची संधी मिळत नाही असे सांगून, करोना हे जसे आव्हान होते तसेच ती एक सेवेची संधी देखील होती असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे व ठाणे महानगरपालिकेतील कोविड टास्क फोर्स अंतर्गत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना करोना काळातील सेवांकरिता राज्यपालांच्या हस्ते ‘ठाणे सिटिझनस प्राईड’ पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला पोलीस महासंचालक व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, ठाणे सिटिझनस फोरमचे अध्यक्ष कॅस्बेर ऑगस्टीन व जेव्हीएम धर्मादाय फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र मेहता प्रामुख्याने उपस्थित होते.

करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम असून सर्व करोना योद्ध्यांनी यानंतर जनतेमध्ये जाऊन मास्क वापर, सुरक्षित अंतर राखणे आदी करोना विषयक सावध आचरणाबाबत जनजागृती करावी असे आवाहन राज्यपालांनी केले.  

राज्यपालांच्या हस्ते यावेळी ठाण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ शिवाजी पाटील, उपजिल्हाधिकारी रेवती गायकर, एस डी ओ अविनाश शिंदे, तहसिलदार अधिक पाटील, जिल्हा वैदयकिय अधिकारी डॉ कैलाश पवार, मनोरुग्णालयचे अधिक्षक डॉ संजय बोदडे, सर्कल अधिकारी संजय पतंगे, तलाठी आरती नितीन यशवंतराव, परिचारिका वर्षा दळवी, वॉर्डबॉय विक्की धाकोलिया, ठाणे महानगरपालिकेच्या कोविड टास्क फोर्स टीमचे वैदयक‍िय अधिकारी डॉ वैजयंती देवगेकर, ठाणे महानगरपालिकेचे गिरीश झलके, ठाणे महानगरपालिकेचे रुग्णालयाचे वैदयकिय अधिक्षक, डॉ ए ए मालगावकर, ठाणे महानगरपालिकेचे उपजिल्हाधिकारी वर्षा दिक्षीत, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ भीमराव जाधव, वैदयकिय अधिकारी डॉ खुशबु टावरी, वैदयकिय अधिकारी डॉ अदिती कदम, वैदयकिय अधिकारी डॉ मिलींद उबाळे, वैदयकिय अधिकारी डॉ स्म‍िताली हमरूसकर, वरिष्ठ वैदयकिय अधिकारी डॉ अनिता कापडणे, डॉ प्रसिता क्षिरसागर, वरिष्ठ वैदयकिय अधिकारी डॉ अय्याझ भूमिपुत्र, उप वैदयकिय अधिक्षक डॉ जयेश पनोट, डॉ प्रज्ञा जाधव, डॉ योगिता धायगुडे, स‍िस्टर मंगल पवार, डॉ समिधा गोरे, ठाणे अग्निशामक दलाचे निलेश वेताळ, दिलीप सुरेश महाले, अधर कुलकर्णी, ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, पोलीस दलातील सारिका ढोकले व जहागिंर चोहारी, डॉ अनिकीत ठक्कर, फादर बापटीस्ट विगास, बेथानी रुग्णालयाचे स्टीफन, डॉ राहीश रवीन्द्रन आदींना ठाणे सिटीझन्स प्राईड ॲवार्ड २०२१ ने सन्मानित करण्यात आले. 

 336 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.