महाड, तळीये, पोलादपूर मधील बाधित नागरिकांना ठाणे महापौरांचा मदतीचा हात

महाड, तळीये, पोलादपूर मधील बाधित ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

 ठाणे – गेल्या आठवड्यात झालेल्या अतिप्रलयकारी पर्जन्यवृष्टीमुळे रायगड जिल्हयातील महाड, तळीये, पोलादपूरमधील अनेक नागरिक बाधित झाले आहेत. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाडचे सुपुत्र व ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्यावतीने मंगळवारी (27 जुलै) महाड, तळीये, पोलादपूर येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी महापौरांनी महाड येथील आरोग्य शिबिरास भेट देवून नागरिकांशी विचारपूस केली

 महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे बहुतांश भागात पुरस्थिती निर्माण होवून अनेक नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते, केवळ जीवनावश्यक वस्तू नाहीतर त्यांच्या घरातील सर्वसामानाची देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुराचे पाणी ओसरले तरी संपूर्ण संसार उध्वस्त झाल्याने आज या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. महाड, तळीये, पोलादपूर येथील नागरिकांना मदतीचा हात देण्याच्या दृष्टीकोनातून महाडकर नागरिक व ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

महाड, तळीये, पोलादपूर मधील बाधित नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यात धान्याचे कीट, पिण्याचे पाणी, चटई, चादरी, ब्लॅकेंट,साड्या, कपडे, औषधे आदी वस्तू असून जवळजवळ 20 दिवस पुरेल इतक्या सामानांचा समावेश आहे. महाड, तळीये, पोलादपूर आदी गावांमधील एकूण ४ हजार नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या ठिकाणी अजूनही वीज आलेली नसून पोलादपूर येथे उशिरापर्यत अंधारात देखील रात्री १०.३०वाजेपर्यत मदतकार्य सुरू होते.

यावेळी विभागप्रमुख दिपक म्हस्के, कोपरी शाखाप्रमुख महादेव पवार, उपशाखाप्रमुख अभिजीत जाधव, गंगाराम नरे, केदार दाबेकर, महेश पवार, खेवरा सर्कलचे शाखाप्रमुख टोनी, उपशाखाप्रमुख नारायण पोळ, सुनील मालुसरे, सुनील कदम, महेंद्र म्हस्के, गणेश पांडे, तानाजी मालुसरे आदींनी मदतकार्यात सहकार्य केले. तसेच निर्भय युवा प्रतिष्ठानचे ईशान बलबले, ठाणे शहर युवासेना अध्यक्ष नितिन लांडगे, रघुनाथनगरचे शाखाप्रमुख रविंद्र कवळे, उपविभागप्रमुख राजेंद्र फाटक, निळकंठ रेसीडन्सीचे गौतम दिघे यांचेवतीने काही ठिकाणी पूरग्रस्तांना मदत करण्यात आली.

जीवनावश्यक वस्तूंबरोबरच नागरिकांची वैद्यकीय तपासणी होणेसाठी ठाण्यातून महाड, तळीये, पोलादपूर येथे वैद्यकीय पथके देखील पाठविण्यात आली असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले. या मदतकार्यामध्ये ज्या ज्या नागरिकांनी स्वत:हून मदतीचा हात पुढे केला त्यांचे देखील महापौरांनी आभार व्यक्त केले व आपद्ग्रस्त नागरिकांच्या पाठीशी आम्ही सक्षमपणे उभे आहोत असेही सांगितले.

 356 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.