बोगस पत्रकारांवर कारवाई करा – पत्रकार संघाची मागणी

ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे पोलीस आयुक्तांना लेखी निवेदन  

ठाणे – ठाणे शहरात बोगस पत्रकारांचा सुळसूळाट झाला असून अनेकांना ते त्रास देत आहेत. या बोगस पत्रकारांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बुधवार, दि. २८ जुलै रोजी ठाणे जिल्हा पत्रकार संघ आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त जयजित सिंग यांना लेखी निवेदन दिले.  

शिष्टमंडळात ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश मोरे, ज्येष्ठ पत्रकार डॉ. दीपक दळवी,  खजिनदार अमोल सुर्वे यांचा समावेश होता.  
सद्यपरिस्थितीत ठाण्यामध्ये काही डिजिटल माध्यमं (यु ट्यूब, फेसबुक ) पत्रकारितेच्या नावाखाली अनेकांकडून पैसे वसुली करीत आहेत. हि बाब अत्यंत गंभीर असून नियमित पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना त्रासदायक ठरत आहे. हे बोगस पत्रकार शहरातील नागरी समस्या मांडण्याऐवजी केवळ लॉज, हुक्का पार्लर आणि बार यांच्या बाबतीत ठराविक हेतूने ट्विट करत असल्याने समाजात पत्रकारांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.

याबाबत ठाणे जिल्हा पत्रकार संघ आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाकडे वारंवार तक्रारी आल्या आहेत. याची दखल घेऊन या बोगस पत्रकारांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने केली. पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी शिष्टमंडळाच्या मागणीबाबत सकारात्मकता दाखविली.

 317 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.