ठाणे महापालिकेच्या वैद्यकीय पथकांमार्फत महाडच्या ३०० नागरिकांच्या आरोग्य तपासण्या

डेंग्यू, मलेरिया व लेप्टोस्पायरोसीस बाधित रुग्णांवर तात्काळ उपचार

ठाणे – ठाणे महापालिकेच्या वैद्यकीय पथकांमार्फत रायगड जिल्ह्यातील महाड येथे पुरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या ३०० नागरिकांच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या असून डेंग्यू, मलेरिया व लेप्टोस्पायरोसीस बाधित रुग्णांवर तात्काळ उपचार करण्यात येत आहे. दरम्यान  लेप्टोस्पायरोसीस आजार होवू नये म्हणून नागरिकांना डॉक्सिसायक्लीन औषधांची मात्रा देण्यात आली आहे.

महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या पुढाकाराने महानगरपालिकेच्यावतीने पाठविण्यात आलेल्या पथकामार्फ़त महाड येथे आरोग्य शिबीर राबविण्यात येत आहे. या ठिकाणी कुठलाही साथरोग उद्भवू नये तसेच कोविडच्या संसर्गाचा वेळीच प्रतिबंध करता यावा यासाठी वैद्यकीय पथकामार्फत तपासण्या सुरु करण्यात आल्या आहेत.

 यामध्ये जवळपास १०० व्यक्तींची रॅपिड ॲटीजन टेस्ट करण्यात आली असून सर्वांचे  लेप्टोस्पायरोसीस तसेच मलेरिया तपासणी करण्यात आली असून चिखल्या आजाराचे रुग्ण सापडले आहेत.  तसेच १ डेंग्यू, २ मलेरिया व ५ लेप्टोस्पायरोसीसचे रुग्ण सापडले असून त्या सर्व  रुग्णांवर वैद्यकीय पथकामार्फत उपचार करण्यात येत आहेत. तसेच  स्थानिक आरोग्य यंत्रणेशी समन्वय साधून या आजाराची माहिती देण्यात आली आहे.  

 393 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.