उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय – अजित पवार

बारामती मध्ये एका कार्यक्रमामध्ये एका प्रसंगावरुन अजित पवार भडकले. उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय, अशा शब्दात त्यांनी काम घेऊन आलेल्या व्यक्तीला सुनावलं

बारामती – बारामतीमधल्या एका कार्यक्रमामध्ये एका प्रसंगावरुन अजित पवार भडकले. ‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय’, अशा शब्दात त्यांनी काम घेऊन आलेल्या व्यक्तीला सुनावलं.

नेहमीप्रमाणे अजित पवार शनिवारी पुण्याच्या आणि रविवारी बारामतीच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात सर्वसामान्य बारामतीकर आपापली कामं घेऊन अजित पवारांकडे येत असतात. आज सकाळी बारामतीमधल्या देसाई इस्टेट इथे अजित पवारांचा  कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी एक व्यक्ती आपलं काम घेऊन पवारांकडे आला. यावेळी आपल्या कामाचं निवेदन त्याने अजित पवारांना  दिलं.

माझे पैसे एका व्यक्तीकडे अडकले आहेत. या निवेदनाच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो ती यामध्ये लक्ष घालून मला सहकार्य करावं. अशी विनंती संबंधित व्यक्तीने पवारांकडे  केली. निवेदन पाहून अजितदादा भडकले. त्यावर ‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय’, अशा शब्दात अजितदादांनी संबंधित व्यक्तीला सुनावलं.

बेकायदेशीर व्यवसाय कोण करत असेल, सावकारी करत असेल तर त्याला मोक्का लावला जाईल’, असा सज्जड दम अजित पवार यावेळी दिला. ‘चांगल्या सवयी लावा, नको ती कामे घेऊन येऊ नका. उपमुख्यंत्री काय वसुली करायला बसला नाही’, असं अजित पवार म्हणाले.

 365 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.