रविवार दि. २५.७.२०२१ रोजी ट्रान्स हार्बर आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक

मेन लाइनवर मेगा ब्लॉक नाही

मध्य रेल्वे रविवार दि. २५.७.२०२१ रोजी देखभाल कार्य करण्यासाठी आपल्या उपनगरी विभागातील ट्रान्स हार्बर आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक परिचालीत करणार आहे

ठाणे/वाशी – नेरुळ अप व डाउन ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० दरम्यान

ठाणे येथून सकाळी १०.३५ ते संध्याकाळी ४.१९ या वेळेत वाशी / नेरूळ / पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन सेवा आणि
पनवेल / नेरुळ / वाशी येथून सकाळी १०.१५ ते संध्याकाळी ४.०९ या वेळेत ठाणे करीता सुटणाऱ्या अप मार्गाच्या सेवा रद्द राहतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी /वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते संध्याकाळी ४.४० दरम्यान आणि चुनाभट्टी /वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० दरम्यान

डाउन हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई / वडाळा रोड येथून सकाळी ११.३४ ते सायंकाळी ४.४७ दरम्यान वाशी/बेलापूर /पनवेल करीता सुटणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.५६ ते सायंकाळी ४.४३ या वेळेत वांद्रे / गोरेगाव करीता सुटणाऱ्या सेवा रद्द राहतील.

अप हार्बर मार्गावर पनवेल/ बेलापूर /वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणाऱ्या आणि वांद्रे / गोरेगाव येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ४.५८ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकरीता सुटणाऱ्या सेवा रद्द राहतील.

मेन लाइनवर कोणताही मेगा ब्लॉक नाही

तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.

ब्लॉकच्या कालावधीत ट्रान्स हार्बर मार्गावरील आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे.

पायाभूत सुविधा व सुरक्षिततेसाठी हे देखभाल करणारे मेगा ब्लॉक आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.

 471 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.