पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के महाडमधील तळीये गावी रवाना

आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये टीडीआरएफ पथकही रवाना

 ठाणे – रायगडमधील महाड तळीये गावामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेची बातमी कळताच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के हे ठाणे आपत्ती प्रतिसाद (TDRF) दलाच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहे.

गेल्या चार दिवसापासून कोकण विभागात प्रचंड प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे. यामध्ये बहुतांशी विभाग प्रभावित झाले आहे. आज सकाळी महाडमधील तळीये गावांमध्ये अचानक दरड कोसळून यामध्ये बरेच रहिवासी बाधित झाले आहेत, यामध्ये अंदाजे 32 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, सदरची बातमी मिळताच बचावकार्य करण्याच्या दृष्टीने ठाणे आपत्ती प्रतिसाद दलासह ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के हे घटनास्थळी रवाना झाले आहेत. ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दुर्घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून ठाण्याच्या आपत्ती व्यवस्थापनास घटनास्थळी पोहचण्याचे आदेश दिले. त्यानुसार ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे (TDRF) १२ प्रतिसादक(Responder), १ वाहन चालक, १ मिनी बस) आज दुपारच्या सुमारास रवाना झाले आहेत.

 281 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.