खेडमध्ये घरांवर डोंगर कोसळला; १७जण ढिगाऱ्याखाली तर रायगडात दरड कोसळून चौघांचा मृत्यू

खेड – मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतील खेड आणि चिपळूण मध्ये महापूर आल्याचं पहायला मिळत आहे. त्यात आता मुसळधार पावसात घरांवर डोंगर कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खेडमधील पोसरे बौद्धवाडीत मीठ डोंगर घरांवर कोसळला. या दुर्घटनेमुळे जवळपास १७ नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

डोंगर कोसळून झालेल्या या दुर्घटनेत २५ जनावरांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. डोंगर कोसळून झालेल्या या दुर्घटनेमुळे खेडमधील पोसरे गावावर काळाचा घाला.

रायगडमध्ये दरड कोसळून चौघांचा मृत्यू

तर तिकडे रायगड जिल्ह्यात दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. पोलादपूर तालुक्यातील साखर सुतार वाडी येथे दरड कोसळून आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अजून ५ जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. तर ४ जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या गावांना जोडणारे पितळवाडी- उमरठ फाटा पूल तसेच उमरठ फाटा ते साखर पूल देखील वाहून गेल्यामुळे मदत यंत्रणा पोहोचू शकत नाही.

 272 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.