चिपळूणमध्ये पावसाचा हाहाकार 

गेल्या चोवीस तासांमध्ये रत्नागिरी, कोल्हापूर, अकोला अशा विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. कोकणात चिपळूण आणि खेड परिसरात पुराचा तडाखा बसला असून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी NDRF आणि हवाई मार्गाने बचाव कार्य सुरू झाले आहे.

चिपळूण
– ढगफुटीमुळे चिपळूण शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात पुराने हाहाकार माजवला आहे. चिपळूण शहरात पाणीच पाणी झाले असून विविध ठिकाणांहून आलेल्या किमान १२०० लोकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यांना सोडविण्यासाठी स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफची पथके कार्यरत झाली आहेत.कळंबस्ते भागशाळेजवल जिथे वाशिष्ठीचा प्रवाह भयंकर आहे तिथे रात्रीपासून घरांच्या छतावर अनेक माणसे अडकली आहेत.  रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड शहरामध्ये पुराचा पाणी शिरलं आहे. भरती आणि अतिवृष्टीची वेळ एकत्र आल्यामुळे खेड आणि चिपळूणमध्ये परिस्थिती गंभीर झाली. अनेक लोक अपार्टमेंटमध्ये अडकले आहेत.

मुसळधार पावसामुळे आपत्ती व्यवस्थापन सतर्क झाले आहे. NDRF ची 9 पथके रवाना करण्यात आली आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड शहरामध्ये पुराचा पाणी शिरलं आहे. भरती आणि अतिवृष्टीची वेळ एकत्र आल्यामुळे खेड आणि चिपळूणमध्ये परिस्थिती गंभीर झाली. अनेक लोक अपार्टमेंटमध्ये अडकले आहेत.

 351 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.