दोन डोस घेणाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा द्या – राज ठाकरे

“ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले त्यांच्यासाठी तातडीने लोकल सेवा सुरू करा” राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई  – मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ट्रेन सुरू करण्याची मागणी सामान्य नागरिकांसोबतच प्रवासी संघटना सुद्धा करत आहेत. याच संदर्भात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात राज ठाकरे यांनी लोकल सेवा सुरू करण्याच्या संदर्भात मागणी केली आहे. मुंबईकरांचे रोजचे हाल थांबवण्यासाठी मुंबईची लोकल सेवा निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत अशा सर्वांसाठी अत्यंत तातडीने सुरू करावी अशी मागणी राज ठाकरेंनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे. 

पाहूयात काय म्हटलं आहे या पत्रात…

राज ठाकरेंनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं, गेल्या १५ महिन्यांपासून देशाप्रमाणे महाराष्ट्रात अनेक प्रकारचे निर्बंध सरकारने लागू केले आहेत. हे निर्बंध आपण सर्वच जण पाळत आलो आहोत. पण आजकाल हे निर्बंध नक्की कोणासाठी असा प्रश्न पडू लागला आहे. त्यातल्या त्यात सध्या मुंबई शहरासाठी जे निर्णय घेतले जात आहेत. ते तर अनाकलनीय आहेत.

 274 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.